Gold :या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी तुफान घौडदौड केली. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली.
तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली. सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे.
चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित (eys)
ऑगस्टच्या अखेरच्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिला होता. आता सणासुदीत नवीन विक्रमाकडे दोन्ही धातूंची घौडदौड सुरू झाली आहे.
या आठवड्यात सोन्यामध्ये 500 रुपयांची वाढ झाली.
आठवड्याच्या सुरुवातीला सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. 11 सप्टेंबर रोजी सोने 380 रुपयांनी वधारले. 13 सप्टेंबर रोजी त्यात 130 रुपयांची भर पडली.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोन्याने यावर्षात 77,000 रुपयांचा रेकॉर्ड केला आहे. तर चांदीने 87 हजारांचा टप्पा ओलांडला होता.
Gold :या सणासुदीत हा विक्रम तुटण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी या आठवड्यात 5 हजारांनी महागल