लोणार सय्यद जहीर
gharkulyojna :लोणार रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता त्वरित घ्या नसता नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेना उ.बा.ठा. च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार यांना देण्यात आला
त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)
लोणार येथील रमाई घरकुल योजनेअंतर्गत मुख्याधिकारी यांनी विधान सभा निवडणुकीच्या अगोदर घाई घाईने पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता सदरील घरकुलधारकांना दिला त्यानंतर लाभार्थ्यांनी आपले घर पाडले व नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली.
या घटनेस पाच महिने उलटून गेले तरी अद्याप पुढील हप्ता त्यांना मिळालेला नाही नगरपरिषदेने पहिला हप्ता विधानसभा निवडणुकी अगोदर गडबडीत का होत नाही पण दिला आणि तो दिला म्हणजे प्रशासनाने सर्व कागदपत्रांची पूर्तता, नियम अटी घरांचे सर्वे करूनच व संपूर्ण अभ्यासुनच दिलेले आहे मग दुसरा हप्ता देण्यास काय हरकत आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सदरील लाभार्थी यांच्या डोक्यावरचे छत हिरावलेले आहे, त्यांचे संसार उघड्यावर आले आहे करिता आपण त्यांचा पुढील हप्ता येत्या पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावा.
gharkulyojna:नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच लाभार्थी यांच्यासह नगरपरिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे तालुकाप्रमुख एड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुकाप्रमुख तारामती जायभाये, शहर संघटक कैलास अंभोरे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, विभागप्रमुख गोपाल मापारी, सुदन अंभोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, विनायक मापारी, अमोल सुटे, फहीम खान, ज्ञानेश्वर दूधमोगरे, सचिन सरदार, गुलाब सोनवणे आदींनी दिला