यश हे परिश्रमपूर्वक वारंवार केलेल्या छोट्या प्रयत्नांचे परिणाम आहे–आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे मुख्याध्यापक आढावा व प्रेरणा कार्यशाळेत प्रतिपादन. Gadchirolinews

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

Gadchirolinews:गडचिरोली-शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,सर्व केंद्र प्रमुख यांच्या करीता दिनांक २८ एप्रिल ते २ मे २०२४ या कालावधीत विद्यार्थी,शिक्षक व शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे पूर्वनियोजन करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांच्या आढावा सभा घेऊन जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक यंत्रणेला प्रेरीत करीत आहेत.

आज दिनांक २ मे रोजी चामोर्शी-मुलचेरा,गडचिरोली व धानोरा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची कारमेल हायस्कूल गडचिरोली यांच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीचे अध्यक्ष आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली ह्या होत्या तर प्रमुख अतिथी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी प्राथमिक पवार,शिक्षणाधिकारी माध्यमिक वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विवेक नाकाडे,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरसिंग गेडाम, गडचिरोली गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा,चामोर्शी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, धानोरा गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना म्हणाले की शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, वर्गखोल्या सुंदर आणि स्वच्छ करणे, प्रधानमंत्री पोषण आहार योजनेची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करणे, परसबाग फुलवीने, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी अधिकाधिक उन्नत करणे,युडाईस आणि सरल प्रणाली अद्यावत करणे, शिक्षण परिषदांना नियमित उपस्थित राहुन स्वतः शिकणे व इतरांना शिकण्यासाठी मदत करणे, फुलोरा शालेय परिपाठातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे,माता पालकांसाठी सभा घेऊन प्रगतीचा आलेख सादर करणे, शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग घेणे, पर्यवेक्षणिय यंत्रणेनी शाळाभेटीतून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मदतगार ठरणे, शैक्षणिक वातावरण आनंददायी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे,NAS,PGI मध्ये जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचाविणे, फुलोरा उपक्रमाची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

या तारीख ला होणार भेंडवळची घटमांडणी ?घटमांडणीला आता पर्यंत तीनशे वर्ष पेक्षाची जास्त परंपरा ( bhendvalnews )

कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य धनंजय चापले यांनी निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित करण्यासाठी प्रत्येक वर्गाच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती येण्यासाठी मुख्याध्यापकांची भुमिका महत्वाची असते यावर प्रकाश टाकला.सोबतच भाषा,गणित व इंग्रजी विषयांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा कोणत्या स्तरावर आहेत?टाप टेन आणि बाटम टेन चा संपूर्ण गोषवाऱ्यासह अहवाल याबाबत मार्गदर्शन केले.अध्यापन पद्धती, शिक्षक कौशल्य आणि मूल्यमापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
शिक्षकांनी संकल्प करून गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करावा असे उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांनी आवाहन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Gadchirolinews:आढावा व प्रेरणा कार्यशाळेत गडचिरोली-धानोरा-चामोर्शी-मुलचेरा तालुक्यातील जवळपास सातशे मुख्याध्यापक,फुलोरा समन्वयक, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी,गट साधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यशाळेचे सूत्रसंचालन गट साधन केंद्र चामोर्शीचे गटसमन्वयक चांगदेव सोरते यांनी केले.

Leave a Comment