शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पंजाबचे व्ही एम सिंग 20 सप्टेंबरला संग्रामपूरात..(former )

 

Former :संग्रामपूर/ शेतकरी शेतमजुर व महिला बचत गटांच्या प्रश्नासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी संग्रामपूर येथे शिव जनस्वराज्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यासाठी पंजाबचे व्ही एम सिंग यांच्या सह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी केद्र सरकारला झुकवून देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्ही एम सिंग यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

सर्वाधिक आत्महत्याग्रस्त बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे होत असलेल्या शिव जनस्वराज्य मेळाव्यात सहभागी होऊन व्ही एम सिंग महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलनाचे कोणते शस्त्र उपसतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

राज्यातील शेतकरी शेतमजूर व महिला बचत गटांच्या प्रश्नावर राजु शेट्टी यांनी राज्यभर आवाज उठविला असल्याने संग्रामपूर मेळाव्यासाठी राज्यातील सर्व शेतकरी नेते उपस्थित राहणार आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकरी शेतमजूरांच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आक्रमकपणे लढणारी एकमेव स्वाभिमानी शेतकरी संघटना असल्याने जनमानसात संघटनेला अधिक पसंती मिळत आहे.

या मेळाव्यासाठी गावा गावात शेतकरी शेतमजूर व महिलांची जय्यत तयारी चालु असुन 20 सप्टेंबरला संग्रामपूरात लक्षणीय उपस्थिती राहणार आहे.

Former :यापुर्वीही प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात निघालेले सर्व मोर्चे 50 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या संख्येने धडकले आहेत. या मेळाव्यासाठी व्ही एम सिंग उपस्थित राहणार असल्याने हा मेळावा जिल्ह्यातील सर्वात मोठा मेळावा होणार असल्याचे बोलल्या जात आहे हे विशेष.

Leave a Comment