foreshtnews: मेहकर चे तत्कालीन सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी व घाटबोरी वन परक्षेत्र अधिकारी,वनपाल,वनरक्षक,यांनी अवैध्य रेती वाहतूक प्रकरणी आपल्या अधिकाराचा केला दुरुपयोग,
शेख सईद शेख कदिर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटना नई दिल्ली चे वतीने दिनाक,15/4/2024 रोजी उप वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांचे दालनात निवेदन सादर केले निवेदनात गेल्या कित्तेक वर्ष पासून वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल वाचविण्याचे व वन विभागातील होत असलेला भ्रष्टाचार शासणास्मोर व जनतेसमोर उघड करण्याचे कार्य आमची संघटना करत आहे,
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी वन परिक्षेत्र कार्यालयात अवैध रेती वाहतूक प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले,
घाटबोरी वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव सकर्षा,मांडवा, वडळी,या नियत क्षेत्रात वनरक्षक, वनपाल,यांनी राखीव वन जमिनीतून अवैध्य रेतीची वाहतूक केल्या प्रकरणी विविध ठिकाणी चार वनगुन्हे जारी करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्ती,प्रकरणी वन गुन्हा नोंदविताना जी,पी,एस,फोटो प्रकरणात नोंदवले नाही,
अवैध्य रेती वाहतूक ही खाजगी व मालकी क्षेत्रातील असल्याचे दाखवत राखीव वन जमिनीतून वाहतून केल्या प्रकरणी दंड आकारण्याचा प्रताप वनाधिकारी यांनी केला,प्रत्यक्षात मात्र रेती उपसा वाहतूक प्रकरण मालकी क्षेत्रात येत असल्याने प्रकरण महसूल विभागाकडे वर्ग करणे अपेक्षित होते परंतु तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी उपरोक्त प्रकरणी वाहन चालक मालक यांचे सोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करून अवैध्य रेती प्रकरणी कंपाऊंड केस करण्याची शिफारस वरिष्ठांकडे करण्यात आली असता.
आज मुर्तीजापुर शहरात श्री राम नवमी जन्मोत्सव निमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन…!( ramnavami )
तत्कालीन सहाय्यक उप वन संरक्षक अधिकारी मेहकर यांनी प्रकरणी चौकशी करून केस कंपाऊंड न करता महसूल विभागाकडे वर्ग करणे अपेक्षित होते परंतु महसुली अधिकार नसताना आपल्या पदाचा गैर वापर करत मेहकरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी यांनी प्रकरण केस कंपाऊंड करून वाहतूक दंड आकारून वाहन सोडण्याचे आदेशित केले,
यावरून रेती माफिया सोबत संगनमत करून आर्थिक देवाण घेवाण करून आरोपींना अभय देणाऱ्या तत्कालीन सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी मेहकर,वन परिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक पनपाल यांनी महसुली अधिकार स्वतः वापरून आपल्या पदाचा गैर वापर केला,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा व महसूल विभागाचे झालेले नुकसान दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मलमत्ते तून कपात करण्याचे आदेश देण्यात यावे असे उप वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे
Foreshtnews :निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,वन मंत्री मुंबई,प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रा वनबल नागपूर, मुख्य वनसंरक्षक प्रा अधिकारी अमरावती,जिल्हा अधिकारी बुलडाणा,वन परिक्षेत्र अधिकारी घाटबोरी यांना देण्यात आल्या,,