FarmerNews / एकूण आश्चर्य वाटल असं काय झालं एका रात्रीच शेतकरी करोडपती झालं वाचा नेमका कसं झाला?

0
728

 

FarmerNews: महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाचे जीवन एका रात्रीतच Fortune सारखे बदलले.

याचे कारण म्हणजे त्यांच्या शेतातले एक वडिलोपार्जित रक्तचंदनाचे झाड. हे झाड केशव शिंदे यांच्या वडिलांनी लावले होते, पण त्याच्या खासियतीची कल्पना 2013-14 मध्ये मिळाली.

Helicopter Crash / दुखद घटना: एकाच कुटुंबातील सहा जण एका हेलिकॉप्टर अपघातात ठार”

हे झाड रक्तचंदनाचे असल्याची माहिती रेल्वे प्रकल्पाच्या दरम्यान झाली आणि तेव्हापासूनच शिंदे कुटुंबाच्या या झाडामुळे फायदा होण्याची एक नवी आशा निर्माण झाली.

केशव शिंदे यांच्या शेतातून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग जात असल्याने त्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. भूमी संपादित केल्यावर जमिनीचा मोबदला मिळाला, मात्र रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्य मिळाले नाही.

याचा मोबदला मिळवण्यासाठी शिंदे कुटुंबाने न्यायालयात याचिका दाखल केली. खटल्याचा निकाल हा शिंदे कुटुंबासाठी यशस्वी ठरला.

रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन करण्यात आले आणि त्याची किंमत तब्बल 4 कोटी 97 लाख रुपये असल्याचे समोर आले. मात्र रेल्वे खात्याने इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार, मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक कोटी रुपये जमा केले.

त्यापैकी 50 लाख रुपये शिंदे कुटुंबाकडे जमा करण्याची परवानगी मिळाली. उर्वरित मोबदला रेल्वे दिल्यासच शिंदे कुटुंबाला पूर्णपणे मिळेल.

FarmerNews :हे प्रकरण यवतमाळ आणि त्यापुढे सर्व महाराष्ट्रासाठी एक चांगले उदाहरण आहे की कसे एका झाडामुळे शेतकऱ्यांचे जीवन संपत्तीने भरून निघू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here