FarmerNews :कापूस खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात कापसाच्या दरात वाढ झाली आहे.
12 मार्चनंतर सीसीआयने कापसाची खरेदी थांबवल्यानंतर बाजारातील कापूस विक्री खूप कमी झाली होती, पण गेल्या आठवड्यापासून कापसाचे दर वाढले आहेत.
सध्या कापसाला प्रति क्विंटल 7600 ते 7800 रुपये दिले जात आहे व काही व्यापारी अंदाज व्यक्त करत आहेत की हे दर 8000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.
कापसाच्या दरात ही वाढ होण्यामागे सरकी आणि गठाणीच्या उंच दरांचाही प्रभाव आहे.
सरकीचे दर सध्या 3400 ते 4200 रुपये दर्जेदार गठाणीचे भाव मात्र 55 हजार रुपये आहेत. मागील हंगामात अतिवृष्टी आणि किडींमुळे उत्पादन कमी झाल्याचे, आणि आता वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना
“हे तर जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतंय” असे वाटत आहे. कापूस साठवलेल्या शेतकऱ्यांना ही वाढ फायद्याची ठरेल, पण आधीच कापूस विकलेल्यांना यापासून पश्चात्ताप वाटतोय.
एका शेतकऱ्याने यावर भाष्य करताना म्हटले,
“मेहनत करून पिकवलेला कापूस गरजेमुळे कमी भावात विकावा लागला आणि आता भाव वाढले, हा खऱ्या अर्थाने दु:खदायक परिस्थिती आहे.”
FarmerNews :व्यापारी आणि मोठे शेतकरी मात्र दर्जेदार कापूस विकताना आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वाढल्यामुळे कापसाचे दर 8000 रुपयांवर जाण्याचा अंदाज बांधत आहेत.