पीक विम्याची ऑनलाइन तक्रार करून जवळपास एक महिना पूर्ण होत आहे तरीसुद्धा अजून सर्वे झालेला नाही(farmer)

0
1

 

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

farmer:पिक विमा कंपनीने सर्वे न केल्यास आचारसंहितेमध्ये आंदोलन करण्याचा इशारा श्री बालाजी सोसे व गजानन जायभाये

मागील वर्षी खरीप आणि रब्बी पिकाचा अद्याप पिक विमा मिळाला नाही अनेक वेळा उपोषण ,मोर्चे ,जलसमाधी आत्मदहन असे अनेक प्रकारे आंदोलन केले तरी सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्याला अद्यापिक विमा मिळून दिला नाही अशातच पुन्हा शेतकऱ्यापुढे नवे संकट उभे राहिले .

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

यावर्षी 2024 चा सिंदखेड राजा मतदार संघामध्ये शेतकऱ्यांनी परत पीक विमा खरीपचा भरला असून पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून पिक विमा ऑनलाईन तक्रार केली असता सुद्धा आज पर्यंत एक महिना होऊन सुद्धा शेतकऱ्यांची पिक विम्याचा सर्वे झाला नाही असंच चालू राहिलं तर शेतकऱ्याला याही वर्षी पिक विमा मिळणार नाही असे चित्र दिसत आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

म्हणून या संपूर्ण सिंदखेड राजा मतदार संघातील सर्व नेतेमंडळी सध्या आपल्याला आमदारकीचे तिकीट कोण्या पक्षातून मिळेल याकडे त्यांचे सर्वांचे लक्ष लागले आहे या मतदारसंघांमध्ये जवळपास मतदार 80 टक्के मतदार हा शेतकरी असून या शेतकऱ्याकडे या नेत्यांचे लक्ष नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मताकडे सुद्धा नेत्यांनी अपेक्षा ठेवू नये

farmer:कारण आमच्या पिक विमा बद्दल आणि शेतकऱ्याच्या मागण्याबद्दल जर तुम्हाला बोलायचं नसेल तर
पिक विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांनी जर या शेतकऱ्यांचा पिक विमा ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यां च्या पिकाचा जर सर्वे झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये परत पुन्हा आंदोलन उभं करू आचारसंहिता गेली खड्ड्यात पण पहिलं प्राधान्य शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे द्या असा इशारा या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वय श्री बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here