बळीवंश, शेतकरी योद्धा व युवा संघर्ष समिती च्या वतीने रूम्हने मोर्चाचे आयोजन
पत्रकार प्रतिनिधी
Farmer :सिंदखेडराजा तालुक्यातील सप्टेंबरमध्ये 2023 अतिवृष्टीने ,26 नोव्हेंबर 2023 च्या गारपीटीमुळे रब्बी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहीले होते तो पिक विमा तात्काळ मिळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय ते उपविभागीय कार्यालय वर भव्य रूम्हणे मोर्चाचे आयोजन आज 10 आकटोबर 2024 बळीवंश लोकचळवळ,युवा संघर्ष समिती केले आहे
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
सर्व शेतकरी माय बाप जनतेला हात जोडून विनंती आहे आत्ता तरी स्वतःच्या हक्काच्या पिकविम्यासाठी एकत्र या जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी आपली स्वतःचे पद वाचवण्यात व्यस्त आहे.
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिले असल्याने आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे सर्वच नेते स्वतःची आमदारकी आणि स्वतःचे पद वाचवण्यात व्यस्त झाले पण कष्टकरी मायबापाच्या शेतकऱ्यांच्या पिक विम्यासाठी आता कोणीच बोलायला तयार नाही पिक विमा मिळून दिल्याचे श्रेय सर्वजण घेतात पण माझ्या अतिवृष्टी आणि गारपीट बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोणी समोर येत नाही.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील तमाम शेतकरी, कष्टकरी बांधवांना आणि भगिनींना आवाहन करण्यात येते की दि 10 ऑक्टोबर 2024 ला गुरुवारी 2023 सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे (खरीपाचे) आणि 26नोव्हेंबर2023 गारपिटीमुळे झालेल्या (रब्बीचे) प्रचंड मोठया नुकसानीचे विमा कंपनी कडून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी भव्य रुम्हणे मोर्चाचे तहसील कार्यालय ते उप विभागीय कार्यालय आयोजन करण्यात आले असून निवेदन सादर करायचे आहे.
Farmer :तरी हजारोंच्या संख्येने यायचे भावांनो आणि येतांना भगिनींनाही घेऊन या कारण आता नाही तर
कधीही नाही आयोजक शेतकरी योध्दा कृती समिती बुलढाणा जिल्हा बळीवंश लोकचळवळ
युवा संघर्षसमिती मातृतीर्थ सिंदखेडराजा यांनी केले आहे