प्रतिनिधि सैय्यद जहीर
Farmer:तालुक्यात 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे शेत पिकांची प्रचंड नुकसान झाले या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यांचे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी
अशी मागणी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शे. समद शे.अहमद यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
25 ऑगस्ट रोजी सायंकाळी परतीच्या पावसाने कहर केला
हिंगणघाट विधानसभेत तुतारी पर्वाची सुरुवात… वाजतेय तुतारी.. वाजणार तुतारी!(Hingnghat)
तालुक्यातील तीन मंडळात ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली, मागील तीन-चार वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ युरो मोझक सारख्या रोगराईमुळे शेतकरी हवालदिल झाले.
आहेत, यावर्षी सुरुवातीपासून सोयाबीन मुंग, उडीद,तुर सह अनेक पिकाला पोषक पाऊस पडत होता येथे आठ दहा दिवसात मूंग उडीद सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येणार होते परंतु मागील दोन-तीन दिवसापासून परतीच्या पावसाने तालुक्यात जोर धरला 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी हिरडव टिटवी लोणार मंडळात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मुंग उडीद कपाशी भाजीपाला, यासह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचा तात्काळ सर्वे करण्यात यावा व त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशा मागणीची निवेदन काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद,बुलढाणा जिल्हा काँग्रेस माजी सरचिटणीस साहेबराव पाटोळे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, माजी उपनगराध्यक्ष बादशाह खान ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती ,युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब, शहर काँग्रेस उपाध्यक्ष रामचंद्र कोचर, रफिक कुरेशी, असद खान, नागो गणपत धावडे, देविदास गावंडे, शेख आवेश, शेख खाजा सह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
Farmer:निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत आहे मागील दोन-तीन दिवसापासून तालुक्यात पाऊस पडत असून 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी तालुक्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या मुंग उडीद सोयाबीन सह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीचा तात्काळ सर्वे करण्यात येऊन सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करण्यात यावी अशी मागणी कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते साहेबराव पाटोळे यांनी केली आहे