डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड (digital media)

 

 

digital media:पुणे / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले

तसेच श्री.एस.एम.देशमुख यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे संपादक अनिल वाघमारे यांची डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

व्यासपीठावर उपस्थित असलेले परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली जात असल्याचे जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा गजर करत उपस्थित हजारो पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संपादक अनिल वाघमारे हे गेली अनेक वर्षे मराठी पत्रकार परिषदेच्या जडणघडणीत मोलाचं काम करत आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या वडवणी या छोट्याशा तालुक्यात त्यांनी आपल्या पत्रकारीतेचा प्रारंभ केला. व सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीतून सतत पाठपुरावा केला. बीड जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

digital media:त्यांची एकनिष्ठता,संघटन कौशल्य आणि अनुभव या सर्वांचा विचार करून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्यातील पत्रकार,स्नेही मित्र व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment