Devendrafadnvis / रायगडावरुन वादाचा विषय: अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायाच्या स्मारकाबाबत CM फडणवीसांची माहिती

0
80

 

Devendrafadnvis:मुंबईतील गिरगाव चौपाटी जवळच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये जलपूजन केले होते,

परंतु पर्यावरणासंबंधित अडचणींमुळे स्मारकाचे काम रखडले.

मागील काही काळात हा विषय राजकीय पसारा बनला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगडावरील दौऱ्यावर या प्रसंगाची चर्चा झाली.

Santoshdeshmukh/ बीडचा सरपंच आता “अपहरण” ते “हत्या” च्या प्रवासाचा धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाचे काम रखडल्यावर विरोधकांच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आणि हे स्मारक उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून हार मानणार नाही.

स्मारकाविषयीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आले आहे. आम्ही उच्च न्यायालयात लढून हे विषय सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. तसेच दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्याबाबत याचना केली.

रायगडावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे भोसले आणि सुनील तटकरे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते.

Devendrafadnvis :छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here