Devendrafadnvis/ बुलढाण्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात १६ वर्षीय मुलीच्या आयुष्याला अचानक धोका निर्माण झाला होता.
रसवंती मशीन चालवताना तिचे केस अचानक अडकल्यामुळे डोक्यावर सूज आली आणि मेंदूवर दुखापत झाली.
DhanjayMunde / पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा धक्का; करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल
या अपघातातील जखमा गंभीर असल्याने तिला तातडीने जालन्यातील कलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षापर्यंत पोहचल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब निर्णय घेतला. फक्त दोन तासांत या मुलीला एक लाख रुपयांची मदत मिळाली.
ही मुलगी वडिलांचे छत्र नसलेल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होती. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीने मदतीचा हात पुढे केला.
गावातील एकमेव उपजीविका म्हणून ती रसवंती चालवत होती. तिच्यावर उपचार सुरू असताना समाजभान सामाजिक संस्थेने तिच्या औषधांच्या खर्चाची जबाबदारी उचलली.
मुख्यमंत्री सहायता निधीने मिळालेल्या मदतीमुळे रुग्णालय प्रशासनाने उर्वरित खर्चाचा भार उचलला.
Devendrafadnvis :ही घटना केवळ दोन तासांतच हाताळण्यात आल्याने तिच्या आईने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.