यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे
crimenews:यावल तालुक्यातील थोरपाणी आदिवासी पाड्यावरील वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार, दहावर्षीय बालक बचावला, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी यावल ग्रामीण रुग्णालय सांत्वन भेट दिली, यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला,
तर पश्चिम भागात वादळ प्रचंड होते. या वादळात सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून जंगलात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावर घर कोसळले. यामध्ये चार जण जागीच ठार झाले आहे. तर या कुटुंबातील दहा वर्षाचा बालक बचावला आहे.
घटनेची माहिती मिळताच रात्री तहसीलदार मोहन मला नाझिरकर, व पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, हे घटनास्थळी रवाना झाले.
रात्री उशिरापर्यंत मृतदेह काढून शव विच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते पोस्टमार्टम झाल्यानंतर या चौघांवा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
काल सायंकाळी रविवारी वादळी वाऱ्यासह यावल तालुक्यात पाऊस झाला. यात तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा या गावापासून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी आहे
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नानसिंग पावरा हे गरीब कुटुंब असून घर कोसळल्याने त्यांचा 10 वर्षाचा मुलगा वगळता संपूर्ण परिवार ठार झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Crimenews :आता मयतांचा वारसदार शांतीलाल पावरा याला शासकिय नियमानुसार भरीव मदत मिळावी, तसेच त्याच्या शिक्षणासह उपजिविकेची जबाबदारी शासनाने उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.