लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे दोन गट भिडले; तिघे जखमी, चार ताब्यात ( crimenews )

0
2

 

crimenews: बुलढाणा: जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) या गावात लग्नाच्या मिरवणुकीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन गट एकमेकांना भिडले.

यात तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे.


प्राप्त प्राथमिक माहितीनुसार गावातील लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले.

प्रकरणी दोन गटात राडा होऊन तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने डीजे च्या वाहनाचे नुकसान झाले.संग्रामपूर व सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

त्यांनी दोन्ही गटाची समजूत घालून कडक बंदोबस्त तैनात केला. चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. टूणकी या गावाला कडक बंदोबस्तमुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दोन्ही गटाविरुद्ध सोनाला पोलीस ठाण्यात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

crimenews:त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here