शेगाव शहर पोलीस स्टेशनची दबंग कारवाई
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
crimenews : तब्बल बारा वर्षापासून फरार असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अकोला जिल्ह्यातील येणारा तालुक्यात असलेल्या हिवरखेड येथून शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय आशिष गंजरे व त्यांच्या टीमने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन गजाआड केले..
याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम कालखेड शिवारात बीएसएनएल टॉवर च्या 24 नग बॅटऱ्या किंमत अंदाजे एक लाख 39 हजार 992 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला .
बिआरसी चामोर्शी येथे शाळा पूर्व तयारी अभियान प्रशिक्षण.( gadchirolinews )
त्याबाबत पोलीस स्टेशन शेगांव येथे अमोल गजानन गुरव रा. कालखेड यांचे फिर्याद वरून अपराध क्रमांक 160/2012 कलम 379, 34 भा.द. वि. चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील चोरट्यांनी त्या चोरीत अमर राजा कंपनीच्या एकूण 24 नग बॅटऱ्या किमती 1,39,992/- रु चा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी मोहसीन खा हसन खा वय 38 वर्षे रा. चिचारी हिवरखेड जिल्हा अकोला हा तब्बल बारा वर्षांपासून फरार होता. शेगाव शहर पोलीस त्याच्या मागावर होते.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आज दिनांक 13/04/2024 रोजी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे पाटील यांना मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीवरून शेगाव शहर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे साहेब पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शेगांव शहर चे पोलीस उपनिरीक्षक आशिष गंधरे, पोलीस नाईक अमोल जाधव यांनी ग्राम चिचारी पोस्ट हिवरखेड जिल्हा अकोला येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांचे मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.
crimenews : सदर आरोपीची चोरी प्रकरणी विचारपूस सुरू असून त्याचेकडून आणखी काही टॉवर बॅटरी चोरी प्रकरणे किंवा इतर मालमत्तेचे गुन्हे उघडकीस येण्या ची शक्यता आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.नि. आशिष गंद्रे करीत आहेत.