दोन भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रू किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले crimenews

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव .येथील किरणबाप्पू देशमुख यांची बहिन नेहमी प्रमाणे फिरायला जात असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांचे गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किंतीचे सुवर्ण मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना दि.२३/११/२०२३ रोजी ९ वाजेदरम्यान घडली.

हकिकत अशा प्रकारे आहे की किरणबाप्पू देशमुख यांची बहिन श्रीमती ज्योती अरुण थोरात ही जेवण झाल्या नंतर घरा समोरील रस्त्यावर फिरत असताना खामगाव शेगाव रोड वरील उत्तमराव देशमुख कॉलेज जवळील रामेश्वर मुक्तीलाल शर्मा याचे घरा समोर असतांना एक दुचाकीवर दोन अज्ञात इसम काळे टि शर्ट घातलेले फि चे बहिनी कडे पाहून समोर थांबले त्यानंतर फि ची बहिन काही अंतर समोर गेली असता.

मोटर सायकलवर आलेली दोन अज्ञात सडपातळ असलेली मुले बहिनीचे पाठिमागे दुचाकीसह जावुन मागे बसलेल्या मुलाने फि ची बहिन श्रीमती ज्योती हिचे गळ्यात असलेले सोन्याचे मंगळसुत्र अंदाजे वजन ३० ग्रॅम त्या मध्ये आठ काळे मनी असलेली कि. अंदाजे १ लाख ५० हजार रुपये बळजबरीने हिसकावुन चोरून घेवुन खामगाव कडे मोटर सायकलसह पळुन गेले.

याप्रकरणी किरणबाप्पू देशमुख यांचे तोंडी रिपोर्ट वरुन शहर पोलिसांनी दोघा अनओळखी चोरट्या विरूध्द अप न ५८५/२०२३ कलम ३९२, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि आशिष गंद्रे हे करीत आहेत.crimenews

Leave a Comment