स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्र्वर टाले सह ३ कार्यकर्त्यांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला.( Crimenews )

 

डोणगाव येथील शिक्षक सातपुते पती-पत्नी यांनी अकोला येथून नातेवाईक व गुंडांना बोलावून कट रचून पुर्वनियोजीत हत्तेच्या उद्देशाने केला गंभीर हल्ला.

डॉ.ज्ञानेश्र्वर टाले यांच्या डोक्याला गंभिर इजा असल्याने उपचरासाठी संभाजीनगर येथे आय.सी. यू. मध्ये भरती करण्यात आले.


Crimenews: दिनांक. १फेब्रुवारी २०२४ रोजी अंदाजे सांयकाळी साडेपाच वाजे दरम्यान गजानन सातपुते व छाया सातपुते शिक्षक जिल्हा परिषद प.स.मेहकर यांनी तक्रारीच्या रागातुन अकोला येथील नातेवाईकांना व पैसे देऊन गुंडाना बोलावून जाणीवपूर्वक राजकीय लोकांच्या सांगण्यावरून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांची हत्या करण्याच्या उद्देशाने कट रचून.डोणगांव येथे देवेंद्र आखाडे यांच्या सी.एस.सी. सेंटरवर काही दस्तऐवजाची माहिती घेण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले गेले असता तिथे सातपुते दांम्पत्यांनी व महिलांनी जाऊन डाॕ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांच्यासोबत हुज्जत घालून जाणीवपूर्वक वाद तयार केला.

व अकोला येथिल नातेवाईकांना व गुंडांना बोलवुन पुर्वनियोजीत कट रचत कोयत्याने व लोखंडी राॕडने मारहाण करत हत्या करण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचा जीवघेणा हल्ला गजानन सातपुते,छाया सातपुते,धृवल सातपुते, रोहिणी सातपुते,निशा चव्हाण,वैष्णव सातपुते, मंगेश इंगळे अकोला येथील त्याचे साथीदार चोरीच्या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार असलेले चार ते पाच जण यांच्या मदतीने सत्तेचा कट रचून हा हल्ला घडवून आणला यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून जिल्ह्यातील काही सत्ताधारी पुढार्‍यांच्या सांगण्यावरून हा हत्तेचा कट घडवून आणल्याचा संशय व दाट शक्यता असल्याची शंका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले यांनी पत्रकारांसमोर रुग्णालयात सांगितले याचे कारण असे कि येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका त्या अनुषंगाने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले व सहकारी मेहकर लोणार तालुक्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संघटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीच्या माध्यमातून उभ करत आहेत त्त्यांच वाढतं काम वलय पाहून मेहकर लोणार मतदार संघातील परिस्थिती बदलत चाललेले चित्र पाहुन.

पोलीस ठाण्यातील गोळीबारावर अजित पवार स्पष्ट बोलले कि हे नाही पटलं, ( Ganpat Gaikwad Firing )

काही सत्ताधारी पुढार्‍यांच्या पायाखालाची वाळु सरकली असुन त्यांच्या डोळ्यात खूपत असून हा राग सुध्दा मनात धरून या सातपुते दाम्पत्यांना हाताशी धरून रविकांत तुपकर हे लोकसभेचे उमेदवार असुन आपल्याला मात देणार म्हणुन त्यांची बदनामी करुन याला राजकिय रंग देऊन त्यांच्यासह डॉ.ज्ञानेश्वर टाले यांचा राजकिय दृष्ट्या व जिवाने संपवण्यासाठी अडकविण्याचा डाव सातत्याने राजकिय पुढारी करत आहेत. डाॕ.टाले हे रविकांत तुपकर यांचे अंत्यत जवळचे व ताकतीचे सहकारी आहेत.

त्यांना अडकुन त्यांचे या भागातील काम थांबवण्याचा प्रयत्न काही पुढाऱ्यांनी केल्याचा दाट संशय आहे व हे प्रकरण देवेंन्द्र आखाडे यांच्या जागे बद्दल असुन त्यामध्ये इतरांना बदनाम करुन गोवण्याचा प्रयत्न राजकिय दृष्ट्या चालु आहे.माञ खरी परीस्थीती वेगळी आहे.याला राजकिय रंग देऊ नये. सत्तेचा एवढा गैरवापर करणे योग्य नाही.असे मत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.टाले यांनी व्यक्त केले. कारण की सदर घटनेपूर्वी या राजकीय पुढाऱ्यांचे फोन सातपुते दांम्पत्यांना व काही अधिका-यांना गेल्या आठ दिवसापासून सातत्याने सुरू होते.

त्यांच्या फोन डिटेल CDR सुद्धा पोलिसांनी तपासले पाहिजे अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.टाले यांनी केली आहे.जेणेकरुन सर्व सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. आणि या राजकीय पुढार्‍यापासून तसेच सातपुते दाम्पंत्यापासून माझ्या व सहका-याच्या जीवाला धोका आहे.कारण आम्ही त्यांच्या कायम विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत चळवळीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम मेहकर लोणार मतदार संघामध्ये उभे केले असून यामुळे राजकीय पुढार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे हे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याची पद्धत करत आहेत. ही त्यांची स्टाईल फार पूर्वीपासून स्थानिक राजकीय नेत्यांची असल्याचे सांगितले त्यांनी याआधी सुद्धा स्वतःच्या पक्षातील काही लोकांचा घातपात केल्यांचां मतदार संघात सर्वश्रुत आहे.बोगस शिक्षक गजानन सातपुते व छाया सातपुते यांच्या बद्दल शिक्षण विभागातील तक्रार केल्याच्या उद्देशाने देवेंद्र आखाडे यांच्या विरोधातील राग मनात धरून आपली नोकरी जाते असं गजानन सातपुते व छाया सातपुते या शिक्षक पति पत्नीला कळाले यांना चार चार अपत्य असल्यामुळे यांची या तक्रारीमुळे शिक्षण विभागाच्या वतीने चौकशी लागलेली आहे.

त्या भीतीने या राजकीय पुढारी यांना घरी जाऊन ठिक ठिकाणी भेटून मदत घेण्याचा संपुर्ण प्रयत्न केला.त्याबाबत आपल्याकडे पुरावे सुध्दा आहेत व त्या माध्यमातूनच काही राजकिय पुढार्‍यांच्या मदतीने हा हत्या करण्याचा डाव,कट काही दिवसापासुन रचण्यात आला असावा.

अकोल्यातील लोकांचा डोणगाव मध्ये येऊन हल्ला करणे म्हणजे हा किती मोठा हत्तेचा कट असू शकतो यावरून लक्षात येते त्यामध्ये असलेल्या व्यक्ती इंगळे व त्याचे मिञ हे अज्ञात असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे अकोला येथे दाखल आहेत माञ त्यांना पैसे (सुपारी)देऊन डोणगाव मध्ये बोलून घेण्यात आलं यासाठी सर्व मदत स्थानिक राजकीय काही सत्ताधारी पुढार्‍यांनी केल्याची दाट शक्यता असल्याने सदर राजकीय पुढाऱ्यांचे व सातपुते दाम्पत्याचे संपूर्ण कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष न करता यांचे पाळेमुळे शोधून याचा खरा सुञधार कोण आहे.

 

तो शोधुन काढून त्या राजकीय लोकांना सुद्धा जेलमध्ये टाकले पाहिजे खऱ्या अर्थाने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करुन बिघडवण्याचे काम कोण करत आहे व त्यांचे सूत्रधार कोण आहे हे महत्त्वाचं असून पोलिसांनी त्या दिशेने तपास करणे गरजेचे आहे असे. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले. तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतांना देखील सातपुते दांम्पत्य व त्यातील इतर आरोपींना त्यांना कुठली दुखापत नसताना सुद्धा मोकाटपणे उघड माथ्याने गावात फिरत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे अन्यथा यांना खुले सोडल्यास पुन्हा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाता बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Crimenews : व सदर आरोपी हे पुराव्या नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात असा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष टाले यांनी केला. शासकिय नोकरीवर असलेल्या या दांपत्यांना अटक करू नये म्हणून राजकीय पुढाऱ्यांचा पोलिसांवर प्रंचड दबाव आहे.परीस्थीती पहाता असे लक्षात येत आहे.माञ पोलींसानी त्यांचे काम राजकिय दबावाखाली न येता कायदेशिरपणे केले पाहीजेत.भविष्यकाळात पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत.शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो.

Leave a Comment