प्रतिनिधी शाम वाळस्कर मुर्तीजापुर
कत्तलीसाठी अवैद्यरित्या निर्दयतेने वाहनात कोंबून नेल्या जाणाऱ्या ४० गोवंशाचे प्राण मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येतील गोवंश एका वाहनात कोंबून नेल्या जात असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना मिळाली.
खात्री लायक मिळालेल्या माहितीच्या आधारे ते लगेच सुदाम घुरगुंडे,गजानन सयाम, मनीष मालठाने,ज्ञानेश्वर रडके,विनोद याडे,विजय मानकर,लांजेवार हे आपल्या ताफ्यासह राष्ट्रीय महामार्गावरील सारिका पेट्रोल पंपाजवळ पोचले व सापळा रचला. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरून येणारा आझाद ट्रान्सपोर्टचा सीजी ०४ एनएक्स ४७७९ क्रमांकाचा ट्रक अडवून वाहनाची पाहणी केली असता,त्यामध्ये निर्दयतेने कोंबून ठेवलेले गोवंश आढळून आले.याबाबत पोलिसांनी वाहनचालकाला विचारणा केली.
असता,त्याच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी आरोपीकडून वाहन अंदाजे किंमत दोन लाख रुपये ताब्यात घेऊन वाहनातील कोंबलेले ४० गोवंश ताब्यात घेतले व पुढील देखभालीसह चराईसाठी श्री पुंडलिक बाबा गौरक्षण संस्थान सिरसो यांच्याकडे सुपूर्द केले. पोलिसांनी आरोपी ट्रक चालक सलमान शहा युसुफ शहा वय २८ रा.घोसला मैदापुर एमपी,संतोष भैरव भरवलाल वय ६०,मशीद अली रशीद अली वय २५ सारंगपूर एमपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व एसडीपीओ मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्यानेतृत्वात ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.crimenews