इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव उसनवारी घेतलेले पैसे देण्यास असमर्थता दाखविल्या ने -दिपक गजानन हाडोळे वय ३५ वर्ष यास पोटात चाकू मारून जख्मी केल्याची घटना दि.२१/११/२०२३ रोजी ९.३० वा दरम्यान शिवहरी गेस्ट हाउस समोर घडली.
हकिकत अशा प्रकारे आहे दिपक गजानन हाडोळे हे काका प्रमोद हाडोळे यांचे हॉटेलवर जेवणकरीता डब्बा आणणेसाठी गेलो असता तेवढयात मंगेश विजय गणगणे रा खडकपुरा हा विजय उमाळे यांचे शिवहरी गेस्ट हाउस समोर आला व फी ला म्हणाला की, मला ८ हजार -रुपये दे फी ने आरोपी याला म्हटले की, मी तुला काही दिवस थांब मी काम करुन काही दिवसांनी पैसे देतो,
https://www.suryamarathinews.com/eknath-khadse/
असे म्हटले असता आरोपी यांने मला धक्काबुक्की करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तेव्ढयात मंगेशने त्याचे जवळील फोल्डींगचा चाकु काढुन माझे डावे बरगडीवर मारला त्यामुळे जखम होवुन रक्त निघाले. व मंगेश याने त्या जागेवरील काहीतरी वजनदार वस्तु हातात घेवुन फी चे डावे डोळयाचे भुवइ जवळ मारले त्यामुळे जखम हावुन रक्त निघाले. तसेच मंगेश याने मला शिविगाळ करुन राप्टरने हातपाय तोडुन टाकीन अशी धमकी दिली, अशा फिचे तोंडी रिपोर्ट वरून
पोलिस स्टेशन शेगाव शहर मध्ये आरोपी विरूध्द अप नं ५८३ /२०२३ कलम ३२३, ३२४,५०४, ५०६ भादवी अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहापोनी गजानन गावंडे हे करीत आहेत.