चंद्रलोक सोसायटी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून दोन लॅपटॉप आणि वस्तू असा 47 हजार रुपयांच्या मुद्येमाल लंपास.crimenews 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: स्थानिक शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंद्रलोक सोसायटी परिसरात नवरात्री दसऱ्यासाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या राजवैद्य परिवाराच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 47 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील परिसरात अजय रामचंद्र राजवैद्य वय 54 वर्षे हे त्यांच्या कुटुंबियांसह नवरात्र दसरा सणासुदी निमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते 11 डिसेंबर रोजी घरी परतआल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले व आत मध्ये जाऊन बघितले असता घरातील सामान असते व्यस्त पडलेल्या आढळून आले.

यावेळी पाहणी केली असता एक डेल कंपनीचा व एक एसपी कंपनीचा असे दोन लेपटाप किंमत प्रत्येकी 20000 यासह घड्याळ , मशीन ,चांदीच्या तुरड्या ,तांब्याचे गंगाड, मोठी समई, सह एकूण 47 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशा तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध आपला नंबर 613 ऑब्लिक 23 कलम 454 457 380 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.suryamarathinews.com/crimenews-24/

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकेकर बक्कल नंबर 12 44 करीत  आहेत crimenews

Leave a Comment