Crimenews / फटाके पाहुन फोड असे म्हटल्याने शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील चौघांनी मिळून महिलेला केली लोखंडी पाईप ने मारहाण

 

इस्माईल शेख.बुलढाणा जि.प्र

शेगांव:फटाके पाहुन फोड असे म्हटल्याने शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील चौघांनी मिळून महिलेला केली लोखंडी पाईप ने मारहाण केल्याची घटना इंदिरा नगर येथे घडली या बाबत शेगांव शहर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारराजकन्या अमरदीप रेवसकर वय ३७ वर्ष धंदा घरकाम रा इंदिरा नगर शेगाव या महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

की ती घरासमोर मुलासोबत दिवाळी निमित्त फटाके फोडत असताना फी चे शेजारी राहणारा देविदास बावस्कार व त्याचा मुलगा हरी ओम बावस्कार हा सुध्दा फटाके फोडत होता. देविदास बावस्कार याचा मुलगा हरीओम बावस्कार यांने फटाका फोडला व तो माझे अंगावर उडाला त्यावरून फी ने हरीओम बावस्कार याला म्हटले की तु पाहुन फटाके फोड असे त्यास म्हटले असता हरीओम व त्याचा भाउ डिगु बावस्कार यानी फी ला शिवीगाळ केली

व त्यानंतर त्याचे वडील देविदास बावस्कार, हे आले व त्याने त्याच्या हातमधील लोखंडी पाईप फीच्या डोक्यात मारून जखमी केले त्यामुळे फीच्या डोक्यात जखम होवुन रक्त निघाले व डाव्या डोळ्याचे भुवई वर तसेच उजव्या हाताला तसेच पाठीवर मारून जखमी केले. देविदास बावस्कार हयाची पत्नी मिराबाई बायस्कार ही आली.

व तिने फीचे केस ओढुन खाली पाडले व चापटा बुक्यांनी मारहान केली व तु आमचे नादाला लागून नको नाही तर तुला एखादया दिवशी जीवाने मारून टाकेन अशी धमकी दिली .

अशा तोंडी रिपोर्ट वरून व मेडीसर्टी वरून देविदास बावस्कार , मिराबाई बावस्कार ,. डिगु बावस्कार , हरीओम बावस्कार सर्व रा. इंदीरा नगर शेगाव ता शेगाव विरुद्ध अप क्र- 580 / 2023 कलम 324, 323, 506, 504, 34 भादवी अन्वये दाखल करून तपास शेगांव शहर पोलीस स्टेशन चे पोनी सुनील आंबुलकर साहेब यांचे आदेशाने पोहेका विनायक सरोदे ब नं 745 यांच्याकडे देण्यात आलाआहे crimenews

Leave a Comment