कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================
जिवती – तालुक्यात मागील बऱ्याच वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणून काम करत आहे.त्यात शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन वाढले पाहिजे आणि निसर्ग,मानवाचे आरोग्य यावर विपरीत परिणाम होऊ नये.म्हणून बीसी अंतर्गत कापसावर काम सुरू आहे.या अंतर्गत बंधारा गाळ काढून तो शेतात पसरवणे,टेरेस, शेत तळे, अशा विविध प्रकारचे काम सुरू असताना शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे.
यासाठी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावे कारण कापसाच्या उत्पादनावर न राहता त्यांनी बकरी पालन केले पाहिजे मात्र शेतकऱ्यांच्या या व्यवसायात आरोग्यविषयक अडचणी येऊ नयेत म्हणून पशू सखी ना प्रशिक्षित करणे हा हेतू ठेऊन तालुक्याच्या कार्यालयावर दोन दिवस पशू सखी प्रशिक्षण देण्यात आले.
https://www.suryamarathinews.com/buldhana-crime/
त्यावेळी झालेल्या प्रशिक्षण भेटी दरम्यान सांगितले की कापूस हा सरासरी 65-70 रुपये किलो ने विकतो मात्र बकरा मटण हे 600₹ किलो ने विकले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजे.यावेळी उमेद चे बि एम एम दुधे व गायकवाड उपस्थित होते.
यात बकरीचे आजार,लसीकरण,घ्यायची काळजी आदी विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी प्रशिक्षक म्हणून अश्विनी विश्रोजवार ,कल्पना मडावी,कांता मडावी उपस्थित होते.तर प्रशिक्षणात तालुक्यातील पशू सखी उपस्थित होते.
Cotton