लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने तहसील समोर धरणे अदोंलन ( Congressnews )

 

सय्यद जहीर लोणार तालुका प्रतिनिधि

Congressnews:आज लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने तहसील समोर धरणे
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.

तसेच थकीत पिक विमा रक्कम वितरण तसेच इतर समस्यांबाबत अदोंलन लोनार तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेश मापारी, शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात आज तहसील समोर धरणे अदोंलन करून निवेदन देण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

पाण्याची टाकी जमीन दोस्त झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण? कार्यवाही करण्यासाठी झोपेचे सोंग,जीवनावश्यक गरजच झाली दूर्लक्षीत….?( brekingnews )

मागील ६ महिन्यात राज्यात १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राज्यातील शेतकऱ्याची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून राज्य शासनाने कर्जमाफी करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत,

कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी. त्याचप्रमाणे दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना आर्थ‍िक दिलासा मिळण्यासाठी शासनाने पिक विमा योजना सुरु केली आहे.  खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्हा अग्रस्थानी आहे.

परंतु असे असतांनाही जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

खरीप आणि रब्बी हंगामासाठी 2023-2024 मध्ये पिक विमा योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यातून एकुण 1042801 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 302112 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरुन त्यांना 272.7 कोटी रु. वितरीत होते अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत 77156 शेतकऱ्यांना 51.32 कोटी रु. निधी वाटप करण्यात आला आहे. अजूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची 221.26 कोटी रु. नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे.

जवळजवळ 224992 शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. त्याचबरोबर खत, बियाणे अन् मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहे. मात्र शेतमालाचे बाजारभाव घटतच आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतजमीन बऱ्याच प्रमाणात वनविभागाच्या हद्दीला लागून आहे. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते. रोही, हरिण, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

वारंवार शासनाकडे या समस्यांचा पाठपुरावा करून देखील वनविभागाकडून शेतजमीनींना कुंपणाची व्यवस्था केली जात नाहीये. तसेच वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतमाल नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीनीचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यातील शेतकरी अद्यापपर्यंत प्रतीक्षेत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थ‍िक बळ देण्यासाठी शासनाने त्यांची हक्काची पिक विमा नुकसान भरपाईची थकीत रक्कम तातडीने वितरीत करावी, शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांपासून संरक्षणाची हमी द्यावी, मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा निधी वितरित करावा तसेच कृषी पंपासाठी वाढविलेल्या प्रतियुनिट वीज दरामध्ये कपात करण्यात यावी.

Congressnews:यावेळी कांग्रेस पक्षाचे जेष्ट नेते प्रकाश धुमाळ, अन्नाभाऊ सोशल फोरमचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव पटोळे,माजी पंचायत समिति सभापति ज्ञानेश्वर चिभडे,ओ.बी.सी.सेल जिल्हाअध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात,गट नेते भुषण मापारी, मा.नगर सेवक शेख करामत अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष तौफिक कुरैशी, युवक कांग्रेस जिला अध्यक्ष अनिकेत मापारी,माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे,रामचद्र कोचर,ओ.बी.सेल शहर अध्यक्ष अबांदास इंगळे,माजी नगरसेवक सतोंष मापारी,अरुण जावळे,युवक शहर अध्यक्ष विकास मोरे,तालुका युवक अध्यक्ष अमोल सोनुने, गणेश घायळ, कैलाश घायळ,कृण्णा बाजाड, मदन परसुवाले,शंकर कोकाटे,विनोद राउत,सुरेश वाठोरे,विलास मोरे,सिध्देश्वर वाफुडकर,विलास मोरे,योगेश थोरंवे,मुरली चिभडे,गोपी आखाडे,शुभम कोकाटे,जनार्दन घायाळ,सुरेश वाटोळे,नाथा घुगे, शिवाजी तनपुरे,

Leave a Comment