मेहकर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडण्यात यावे:-कॉंग्रेसची पत्रकार परिषद (Congress )

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

मेहकर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वत आल्या पासुन लोणार चालुक्याला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करन्याची संधी मिळाली नाही.कॉंग्रेस पक्षाने आता पर्यंत मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही.

मेहकर मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यात यावी व साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी देण्यात यावी. मागणी लोणार तालुका व शहर कॉंग्रेसने केली आहे.

अजातशत्रु असलेले साहेबराव पाटोळे यांनी नेहमीच विकासाला महत्व दिले.या भुमिकेतून त्यानी लोणार नगरपालिकेच्या विकासात भर घातली अनेक वर्षापासुन लोणार नगर पालिका मध्ये त्यांच्या कुटुंबातील नगरसेवक दोन वेळा नगराध्यक्ष एक वेळ विरोधी पक्षनेते तर एक वेळा महीला व बाल कल्याण समिति सभापती पद त्यांच्या परिवारितील सदस्यांनी भुषविलेले आहे.

धान्य वितरण कमिशन दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मिळावे या व इतर मागण्या साठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने तहसीलदारांना निवेदन..( buldhananews )

आघाडीकडुन ही जागा घेऊन कॉंग्रेस पक्षाने साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी दिल्यास निच्श्रितच विजयी होतील.
साहेबराव पाटोळे यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे.

त्यांनी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम च्या माध्यमातुन संकल्प मेळावा , परीवर्तन मेळाव्याचे उर्जामंत्री नितीनजी राऊत व महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजन करुन कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Congress :-साहेबराव पाटोळे मातंग समाजातील आहे.हा समाज अनुसुचित जाती मधुन दुसर्या क्रमांकावर आहे.त्यामुळे मेहकर मतदार संघात ह्या समाजाचे मतदार निर्णायक आहे.या बाबींचा विचार करून साहेबराव पाटोळे यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी ध्यावी अशी मागणी लोणार तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने केली आहे.

Leave a Comment