जळगाव जामोद शेगाव दंगल सुनीयोजीत कट/लोकप्रतिनिधी समाजकंटकांची सीबीआय चौकशीची मागणी..(cbi )

 

 

दुसऱ्या आक्रोश निषेध मोर्चाचा इशारा..

Cbi :बुलढाणा: जळगाव जामोद, शेगाव येथील गणपती विसर्जनादरम्यान घडलेली दंगल सुनियोजित कटकारस्थान आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व तथाकथित समाजकंटकांनी सदर दंगल घडवून आणली आहे. सदर दंगलीची सीबीआय चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडिओ चेक करावे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

मोबाईल टावर लोकेशन वरून सीडीआर फाईल चेक करावी. व्हिडिओ बातमी संकलन करणाऱ्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करावी. दोषींवर नियमानुसार गुन्हे दाखल करावे. निर्दोष व्यक्तींवरील गुन्हे खारीज करावे. आदी मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासोबत चर्चा करून सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीने 20 सप्टेंबरला सायंकाळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तथाकथित लोकप्रतिनिधी समाजकंटकांकडून सदर दंगल जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा मोठाआरोप निवेदनात करण्यात आला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आठ दिवसात या अनुषंगाने कारवाई करून चौकशी करावी. अन्यथा सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील दुसरा आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Cbi :यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण , अल्पसंख्यांक पिचडावर्गचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद, आझाद हिंदचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष असलम शाह, महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई ताथरकर, लियाकत खान सबदर खान, पत्रकार राजेंद्र ससाने, यासह पत्रकार बांधव, सर्वपक्षीय प्रतिनिधींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
————-

Leave a Comment