डॉ.आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्या अन्यथा आमरण उपोषण  – दांडगे  

  संग्रामपुर – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडपास निधी असून सुध्दा बांधकामास मंजुरात मिळाली नाही या कामास त्वरित मंजुरात द्या अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा उदेभान दांडगे यांनी नगरपंचायतचे मुध्याधिकारी यांना निवदेनाद्वारे दिले आहे. निवेदनात नमुद की, संग्रामपुर येथील श्री अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रखडलेले कामातील वार्ड क्रमांक ७ … Read more

सुनगाव येथील गाव नदीच्या पुलावरून चार चाकी गाडी कोसळून गाडीचे मोठे नुकसान तसेच चालक जखमी…

  सुनगांव प्रतिनिधी:- गजानन सोनटक्के  जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथून रात्रीच्या सुमारास फोर व्हीलर गाडीचा सुनगांव गावनदीच्या पुलावरून खाली पडल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे सविस्तर असे की सुनगांव वरुन येथील संतोष सुंदरलाल राठी जळगांव च्या दिशेने जाणाऱ्या गाडी क्रमांक MH15GR3714 मारोती सुझुकी हि गाडी सुनगांव जवळील गाव नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरुन … Read more

शेतकऱ्यांना त्वरीत पीक विमा मंजुर करुन आर्थिक मदत द्या – संग्रामपुर तालुका भाजपची मागणी

    संग्रामपुर  तालुक्यातील सततच्या पावसामुळे व कीडीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत पीक विमा मंजुर करुन आर्थिक मदत देण्याची मागणी तालुका भाजपच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुकयातील शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद मुंग तसेच मका पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पिक आनेवारी काढण्या संदर्भात विमा कंपनीचे प्रतिनीधी जानुन बुजुन शेतकऱ्यांना … Read more

जळगाव जा तालुक्यात मडाखेड येथे वाघांच्या जोडीची हजेरी सुरक्षेसाठी वनविभागाला गावकऱ्यांचे निवेदन

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड चावरा येनगाव शिवारात दोन वाघाची जोडी वावरत असून अनेक लोकानी त्याना पाहिले असल्याचे ठाम आणि खात्रीशीर मत आहे असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत जी पाटील यांच्या लेटर हेड वरून वनविभागाला दिले असून संबंधित शीवारातील अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुगीचे दिवस असताना … Read more

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची अत्यंत दुरावस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे चुकवितांना अपघात घडत आहेत.

      अपघातामध्ये अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अक्षरश: या मार्गाची चाळणी झाली असून याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. या विरोधात आज ७ ऑक्टोबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तसेच महामार्गावरील अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, … Read more

हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा… प्रशांत तायडे यांनी काळ्या फिती बांधून दिले तहसीलदारांना निवेदन.

  जळगाव जामोद:-आज दि.५ सप्टेबर रोजी आर.पी.आय.गवई गटाचे बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांच्या नेतृत्वात हाथरस मधील पिडितेला न्याय मिळावा यासाठि काळ्या फित बांधून तहसीलदार मगर साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्टपती यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. देशामधे बलत्काराच्या घटनात लाक्षणिक वाढ होत आहे. उत्तर प्रदेश मध्ये नुकतेच वाल्मिकी समुदायाच्या दलित मुलि वरती पाशवी … Read more

बच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

  अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि … Read more

वसुलीसाठी महिलांना धमकावणाऱ्या महिंद्रा फायनान्स च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर

    वसुलीसाठी महिलांना शिवीगाळ करून धमकावणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या महिंद्रा फायनान्स च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. खामगाव येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे कार्यालय असून ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांना गृह कर्ज वाटप केले आहे. लॉकडाऊन काळामध्ये आर्थिक परिस्थिती बेताची झाल्यामुळे कर्जदार कर्ज भरण्यास असमर्थ आहेत याबाबत रिझर्व्ह बँकेने … Read more

देऊळगाव माळी येथे घडले माणूसकीचे दर्शन गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावले गावकरी

    देऊळगाव माळी .२ विद्युत शॉक लागून मृत्यू पावलेल्या महिलेच्या अपत्या साठी आर्थिक निधी उभारून माणूसकीचे अदभूत दर्शन मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे घडले. या घटनेमुळे परत समाजाच्या दातृत्व शक्तीचा परिचय समाजाला घडला. दिनांक 27 सप्टेंबरला देऊळगाव माळी गावातील महिला सपना विलास गवई या महिलेचा विद्युत धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष … Read more

शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार ला परवानगी द्या ,

  जिल्हाधिकारी यांच्या कडे मांगनि , बुलडाणा , जिल्ह्यात लोकडाऊन सुरू झाल्या पासून भरणारे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले होते मात्र आता बुलडाणा , चिखली , मेहकर , देऊलगावराजा , लोणार , या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यास सुरवात झाली असून शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी … Read more