नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

  ऍक्वा लाईन मार्गिकेवर तब्ब्ल १५४११ प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास नागपूर ०२: काल दिनांक १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली तब्बल १५४११ पेक्षा जास्ती नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतच्या सर्वात मोठा ऊंचाक आहे महत्वपूर्ण म्हणजे १ जानेवारी २०२१ (शुक्रवार) रोजी … Read more

कुठल्याही परिस्थीतीत मुंबईला जाणारच – बच्चू कडू

  ( सूर्या मराठी न्युज ब्युरो) नागपूरात मंत्री बच्चु कडु यांना केली अटक – महाराष्ट्राचे राज्यमंत्री आमदार बच्चू कडू आज मुंबईला मध्ये आंदोलनासाठी नागपूरहून सकाळी जात होते नागपूर पोलिसांनी त्यांना गेस्ट हाऊसला अळवले व जाण्यास जाण्यास मनाई केली सध्या बच्चू कडू गेस्ट हाऊसला आहे आणि नागपुर पोलिसांनी गेस्ट हाऊसला घेरा बंदी केली आहे.

नागपूर मेट्रोच्या रायडरशिप ग्राफ मध्ये होत आहे वाढ एकाच दिवशी तब्ब्ल 17562 नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

  नागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मेट्रोचे संचालन पूर्व पदावर आले असून लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले.ज्यामध्ये रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर,एलएडी चौक, शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंकशन मेट्रो स्टेशन अनलॉक झाले व या स्टेशन मधून प्रवासी सेवा सुरु झाली आहे व नागरिकांना या … Read more

बाबुल की दुवाँये लेती जा…. गृहमंत्री करणार मानस कन्येचे कन्यादान

  रविवारी नागपुरात लग्नसोहळा   नागपूर, दि.१८ : बाबुल की दुवाँये लेती जा…. जा तुझको सुखी संसार मिले… असा आशीर्वाद एका मानस कन्येला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडून मिळत असेल तर..आणखी काय पाहिजे.! हे काही चित्रपटाचे कथानक नसून वास्तव आहे. मतीमंद व मुकबधीर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापडकर यांची मानस … Read more

कचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश

  (सूर्य्या् मराठी न्युज ब्युरो)   नागपूर, ता. १६ : शहरातील नागरिकांच्या कच-याच्या समस्या सुटावी संपूर्ण शहरातील कच-याबाबतचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीकजी आणि एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सुरूवातीच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून उत्तम कार्य झाले. मात्र सद्या दोन्ही कंपन्यांच्या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवाय कंपन्यांकडून निविदेमध्ये नमूद … Read more

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला नागपूर मेट्रोतून प्रवास

  चंद्रपूर, ता. १६ :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. प्रत्येक फेरीनंतर होणाऱ्या निर्जंतुकीकरणासोबतच सर्व नियमांचे पालन होत असलेल्या नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत सुरक्षित असून विदर्भातून नागपुरात येणाऱ्या नागरिकांनीही मेट्रो प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. नागपूर मेट्रोने अधिकाधिक लोकांनी प्रवास करावा यासाठी महामेट्रोतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत … Read more

१५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

    (सूर्या मराठी न्युज ब्युरो) नागपूर, ता.१५  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१५ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २३९४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत … Read more

भ्रष्टाचारमुक्ती, पारदर्शकतेचा आव आणत चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-यांनी आता आपले खरे रूप दाखविणे सुरू केले आहे.

    चंद्रपूर आर्थिक देवाणघेवाणीतून मर्जीतल्या कंत्राटदारांना काम देण्याचा त्यांनी जणू सपाटा लावला आहे. असाच प्रकार कचरा संकलनाच्या कामात झालेला आहे. कचरा संकलनाच्या कामासाठी आधी निविदा मागितल्या. त्यातील मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराला कमी रकमेचे दर असल्याने काम दिले. नंतर काहीतरी कारण सांगून संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली. पुन्हा त्याच कामासाठी ई.निविदा मागितल्या. आधी कंत्राट … Read more

स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार :आठवले

  नागपूर दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमात सहभाग नागपूर दि.१३ : केंद्र शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांवर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत त्यांची कार्यवाही सुरळीत करणे व निर्वाहभत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यास आपले प्राधान्य असल्याची ग्वाही सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले. केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज … Read more

आता धावत्या ‘मेट्रो’त करा वाढदिवसाचे आयोजन

  मेट्रोची ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’ संकल्पना जोमात नागपूर , ता. १२ : धावत्या मेट्रोमध्ये वाढदिवसाचे किंवा अन्य कार्यक्रमांचे सेलिब्रेशन….ही संकल्पनाच धम्माल आहे ना….! तर मग सज्ज व्हा धम्माल करण्यासाठी….सेलिब्रेशन ऑन व्हील करण्यासाठी….नागपूर मेट्रोने यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. मेट्रोने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे सुरू … Read more