यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे
Bus :यावल येथील बसस्थानका जवळ जळगाव विदगाव मार्ग यावल या यावल आगारातील एसटी बस क्रमांक एमएच २० बिएल१४०५ ही बस दुपारी १ वाजेच्या सुमारास प्रवाशी घेवून यावलकडे येत असतांना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर मुख्य मार्गावर अचानक मोठमोठयाने वाहनातुन धुर निघायला सुरूवात झाली.
व त्यामुळे एसटी बस पेट घेते का असा समज झाल्याने एकच खळबळ उडाली व प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाल्याने प्रवाशांनी तात्काळ बस मधुन खाली उतरून पळ काढला.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
सदरची घटना ईतर ठीकाणी घडली असती तर मोठी जीवीत हानी झाली असती. प्रस्तुत प्रतिनिधी यांनी यावलचे आगारप्रमुख दिलीप महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगीतले की वाहनाचे इंजिन गरम झाल्याने हा प्रकार झाला असावा.
असे प्राथमिक माहितीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगीतले दरम्यान समय सुचकता बाळगुण परिसरातील नागरीकांनी व नगर परिषदच्या अग्नीशामन बंबच्या मदतीने गाडीला वाचविण्यात यश आले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
bus:यावल आगारातील अनेक एसटी बसेस या पुर्णपणे नादुरुस्त व जिर्ण झालेल्या असुन, एसटीचे ब्रेक निकामी होणे वाहन बिघाड होवुन कुठही बंद पडणे या घटना वारंवार होत आहे यामुळे प्रवाशांच्या जिवाशी हा खेळ चालला असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या.