प्रतिनिधी सय्यद जहीर
Bus:गोदिया आगाराची गोंदिया-लोणार-गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव प्रतिष्ठित बसफेरी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू असुन सदर फेरीस अमरावती येथील कामगार बदल देण्यात आलेले होते या कामगार बदल मुळे सदर फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त अमरावती पर्यंत तिकिट देण्यात येत होते
,तसेच सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे कामगार बदल मुळे एक ते दिड तास थांबत असल्याने प्रवाशांना बसफेऱ्या बदलुन पुढील प्रवास करावा लागत होता,हिबसफेरी गोंदिया आगाराच्या दोन चालक आणि एक वाहक यांच्याकडून लोणार पर्यंत चालविण्याची मागणी लोणार येथील प्रवाशी सेवा संघटना गत आठ महिन्यापासुन राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयकडे करत होते.
परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे प्रकरण केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे गेले त्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,डॉ.माधव कुसेकर यांना पत्राद्वारे सदर फेरीचे अमरावती येथील कामगार बदल बंद करण्याची मागणी केली.
त्यांच्या मागणीची दखल घेऊन गोंदिया-लोणार या 550 कि.मी एकेरी प्रवास करणारी फेरी दि.1 ऑक्टोबर 24 पासुन अमरावती येथील कामगार बदल बंद करून ती गोंदिया आगाराच्या दोन चालक व एक वाहक यांच्याकडून थेट लोणार पर्यंत चालविण्यात येणार आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशी माहिती प्रवाशी सेवा संघटना,लोणार यांना अमरावती-नागपुर प्रदेशचे प्रादेशिक व्यवस्थापक,श्रीकांत गभणे यांनी भ्रमणध्वनी व्दारे दिली आहे,अमरावती येथील कामगार बदल बंद केल्याने प्रवाशांना नियोजित थांब्या पर्यंत थेट तिकीट उपलब्ध होईल तसेच अमरावती बसस्थानक येथे प्रवाशांना एक ते दिड तास थांबावे लागणार नसल्यामुळे त्यांची हि अडचण कमी होणार आहे,प्रवाशांनी पूर्वीप्रमाणे सदर फेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवाशी सेवा संघटनेचे अध्यक्ष,उस्मान शेख,सचिव,भागवत खरात,यांनी केले आहे.(श.प्र.)
Bus :गत आठ महिन्यापासुन प्रवाशांची होणारी अडचण दूर करण्यासाठी वारंवार केलेली मागणीची केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर तसेच पत्रकार बंधु यांच्या सहकार्याने पुर्ण झाली असुन प्रवाशांच्या वतीने मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मान शेख,अध्यक्ष,प्रवाशी सेवा संघटना,लोणार