Buldhanaurbanbank:वाशिम :- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाशिम च्या मानोरा तालुक्यातील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा अर्बन बँकेच्या वेअर हाऊस विठोली शाखेत शेतकरी आणि व्यापारी आकाश देशमुख या शेतकऱ्याने १६२ क्विंटल टूर आणि ९६ क्विंटल सोयाबीन असा अंदाजे ३० लाख रुपयांचा शेतमाल कारण करून ठेवलेला होता. मात्र शेतकऱ्यांनी ठेवलेला शेतमाल बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी कटकारास्थान रचून बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष आणि दोन्ही विभागातील विभागीय अध्यक्षांच्या सांगण्यावरून गोदाम व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
गोदामतील शेतकऱ्याचा शेत माल परस्पर विक्री करून मालाचे पैसे हडप केले असल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय.
या बद्दल बँकेच्या कर्मचाऱ्या विरुद्ध ३० लाख रुपये रकमेचा शेतमाल परस्पर विकून शेतकऱ्याची आर्थिक हानी करून फसवणूक केली आहे. सदर प्रकार डिसेंबर २०२२ मध्ये घडले होते. मात्र, आर्थिक देवाण-घेवांमुळे गुन्हा दाखल होत असल्याने शेवटी तक्रार कर्त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आणि यावर न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्यास न्याय देत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
न्यायालयाच्या दणक्यानंतर अखेर बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक सह इतर ५ जणांवर फसवणूकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.यात सुकेश ब्रिज मोहन झवर, अमोल प्रल्हाद शिंदे विभागीय व्यवस्थापक वाशिम विठ्ठल तोताराम दवळी बुलढाणा अर्बन विभागीय व्यवस्थापक अकोला श्रीकांत भालचंद्र डांगे शाखा व्यवस्थापक मानोरा, अनिल श्रीराम राठोड गोदाम व्यवस्थापक, विठोली तालुका मानोरा आणि इतर संबंधित सर्व कर्मचारी यांनी संगमत करून बुलढाणा वेअर हाऊस मध्ये तारण ठेवलेला क्विंटल शेतमाल परस्पर विक्री केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम च्या मानोरा पोलीस स्टेशनला भादवि कलम ३७९, ४०६, ४२०, ०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Buldhanaurbanbank:-विशेष म्हणजे याच बुलढाणा अर्बन बँकेच्या इतर शाखेतही काही महिन्यांपूर्वी हरीश चांडक नामक पदाधिकाऱ्याने पन्नास लक्ष रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचेही समोर येत आहे.