दि.05 फेब्रुवारी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदर गड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट येथे स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन बोधकथा स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विष्णू सिरसाट, तुळशिराम म्हस्के, प्रल्हाद सिरसाट, शकिल सौदागर व शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांची उपस्थिती होती.
सविस्तर वृत्त असे की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी जिजाऊ ज्ञान मंदिरात विविध स्पर्धा घेतल्या जातात. याचाच एक भाग म्हणून वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी बोधकथा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वर्ग एक ते नऊच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Buldhananews :यात इंग्रजी भाषेची मर्यादा होती. यामध्ये शाळेतील बहुसंख्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्पर्धा यशस्वी केली या स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता 9 वी तील विद्यार्थी तन्मय काळे याने पटकावला तर द्वितीय क्रमांक सातवी तील विद्यार्थीनी देवयानी सिरसाट हिने मिळवला तर तृतीय क्रमांक आयुष घोलप याने पटकावला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील शिक्षकांचे सहकार्य लाभले.