जावेद शहा बुलढाणा
दि. 01 फेब्रुवारीराजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. सायन्स व क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भट मध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष मा.संदीपदादा शेळके होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक मंडळी होती. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)
यावेळी शाळेच्या प्राध्यापकां बद्दल विद्यार्थ्यांनी स्तुती सुमने गायली तसेच सर्व सोयी सुविधा युक्त डिजिटल माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता चांगल्या प्रकारचे शिक्षण या संस्थेतर्फे पुरविण्यात येतं याबद्दल आभाराचा सुर विद्यार्थ्यांमधून उमटला.
प्रसंगी कॉलेजच्या प्रा. सुनिल सुसर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले की, आदरणीय भाऊसाहेब शेळके यांनी लावलेला शिक्षणरूपी वटवृक्ष उत्तरोत्तर वाढत आहे.
आजच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलताना खूप आनंद होतोय आपण या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च प्रतीचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या साठी मागील वर्षापासून संपूर्ण शाळा डिजिटल करण्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहोत.
त्याचप्रमाणे डिजिटल सिलॅबस सुद्धा आपण त्यातून देत आहोत. येणारे दिवस हे परीक्षेचे असून या परीक्षेच्या काळामध्ये आपण टेन्शन मुक्त परीक्षा द्यावी मनावरील मानसिक ताण घालवण्यासाठी नियमित दहा मिनिटे मेडिटेशन, योग, प्राणायाम करावा, चांगल्या वातावरणामध्ये पेपर सोडवावा. आपले ध्येय एकच असले पाहिजेत. ध्येयपूर्तीसाठी नियमित कष्ट घेणे काळाची गरज आहे. आताच्या युगामध्ये एक नवीन क्षेत्र उदयास आलेले ते म्हणजे सायबर क्षेत्र, या क्षेत्राच्या माध्यमातून नवीन नोकऱ्या तयार होत आहे. भविष्य काळामध्ये चांगला नागरिक बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजेत.
आपण या शिक्षण संकुलात शिकलात लहानाचे मोठे झालात पुढील भविष्यामध्ये आपण उद्योग क्षेत्रात जाल शिक्षणासाठी देश-विदेशात जाल अशा वेळेस कोणत्याही समस्या आपल्याला येत असेल, तर नक्कीच मला किंवा या संस्थेला आपण एक आवाज द्या. त्यावेळेस आपल्याला नक्कीच मदत मिळेल. भविष्यकाळासाठी जिजाऊ ज्ञान मंदिराचे दरवाजे आपल्यासाठी नेहमीच खुले असेल.
buldhananews:“मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है।
“कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले. सुत्रसंचलन पायल चिकटे व आदिती सरकटे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी खंडागळे हिले केले.