Buldhana खामगांव एम.आय.एम.च्यावतीने शहिद-ए-वतन टिपु सुलतान जयंती निमित्त गरजुंना ब्लॅकेट वाटप

 

इस्माईल शेख बुलढाणा. जि. प्र.

एम.आय.एम.च्यावतीने सतत १० वर्षापासून करण्यात येते ब्लॅकेट वाटप
खामगांव : संपुर्ण खामगांव शहरात व मस्तान चौक भागात खामगांव एम आय एम च्यावतीने शहर अध्यक्ष आरीफ पहेलवान तथा
माजी नगर परिषद सदस्य तथा एम.आय.एम चे शहराध्यक्ष यांच्याहस्ते परिसरातील गोरगरीब लोकांना सतत १० वर्षापासून ब्लॅकेट वाटप करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो.

त्यानुसार यावर्षी सुध्दा दि.२०/११/२०२३ रोजी शहिद-ए-वतन टिपु सुलतान यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून १०० चे वर ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले आहे. सदर ब्लॅफेट हे परिसरातील गोरगरीब लोकांना वाटप करण्यात आले असून आजरोजी थडीचे दिवस असल्यामुळे सदर ब्लॅकेटमुळे गरीब लोकांना आवश्यकता असल्याचे पाहून एम.आय.एम. चेवतीने वाटप करण्यात आले आहे.

तसेच गोरगरीब व गरजू लोकांना तसेच परिसरात फिरणान्या अनाथ मनोरुग्ण लोकांचा शोध घेवून त्यांना सुध्दा ब्लॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी छोटेखानी कार्यक्रमात आरीफ पहेलवान यांनी शहिद-ए- वतन टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन शहिद-ए-वतन टिपु सुलतान यांनी केलेला पराक्रमाला कधीही न विसरता त्यांचे शौर्य आठवत राहण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाकरीता सईद मिर्झा साहब, रज्जाक कुरेशी, राजीक कुरेशी, तसेच एम.आय.एम. चे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि मस्तान चौक येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Buldhana

Leave a Comment