Buldhana News निमगांव वायाळ येथील रेती विरोधात बसलेल्या उपोषणास छावा जिल्हाध्यक्ष यांची भेट

 

जिल्हातील महसुल अधिकारी बिहार मध्ये आहे का छावा जिल्हाध्यक्ष

बुलढाणा सुरेश हुसे

बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव वायाळ येथील रेती घाटातून शासन निर्णयाला ठेकेदार व महसूल अधिकारी यांनी पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई साठी निमगाव वायाळ ग्रामपंचायत सदस्य आज ता 25 डिसेबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली.

 

आज छावा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव,गोविंदराव टेके,बाळासाहेब शेळके, संजय उगले, बजरंग काळे,शंकर शिंदे यांच्यासह ईतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपोषणकर्ते यांनी निमगांव वायाळ घाटासबंधी उपस्थित माहिती दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी तहसिलदार यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधुन उपोषणकर्ते मागण्या संदर्भात चर्चा केली असता.

मी आज उपोषण स्थळी भेट देतो असे सांगीतले यानंतर छावासंघटनेने रेती घाटाची पाहणी केली यावेळी जेसीबी व विना नंबर गाड्या चालकांनी रेती घाटातून पलायन केले.

Fraud Loan Apps :- फेसबूक, इन्स्टाग्राम, गूगलला दणका;मोदी सरकारचा “सात दिवसांच्या नंतर.

यावेळी निमगांव वायाळ ग्रामस्थांनी छावा संघटनेकडे सदर रेतीघाटातील ठेकेदारांनी या रेतीघाटातून नियमापेक्षा जास्त रेती चे उत्खनन केले असल्याने सदर रेतीघाट तात्काळ बंद करण्याची विनंती केली असल्याने छावा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव पाटील यांनी गावकरी मंडळी यांना सांगितले.

की आपला जिल्हा का बिहार आहे का तुमचे सहकार्य असल्यास सदर रेती घाट 24तासात बंद करून दाखवू असे ग्रामस्थांना विश्वास दिला

छावा चा काँल अन तहसिलदाराची हजेरी

 

उपोषण स्थळावरून जिल्हाध्यक्ष यांनी तहसिलदार यांच्याशी संपर्क साधला असता सायंकाळी 5:45वाजता तहसिलदार सचिन जयस्वाल यांनी भेट दिली.

Buldhana News रात्री किनगाव राजा चे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे व त्यांच्या टिमने भेट दिली

Leave a Comment