बुलढाणा- मेहकर येथील पोलीस कर्मचारी यांचे वसाहतीचे बांधकामाची अतिशय दुरावस्था झालेली आहे याकरिता मा.मेहकर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा.देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले की, मेहकर येथील पोलीस स्टेशन मागिल दिवानी कोर्ट लगतच्या जागेमध्ये शेकडो वर्षापुर्वीची इंग्रजकालीन पोलीस वसाहत आहे. सदरील वसाहतीत पुर्वीपासुन पोलीस कर्मचारी यांच्या कुटूंबियांना राहण्यासाठी वापरत आहे.
मात्र आज रोजी सदरील पोलीस वसाहतीचे बांधकामाची अतिशय दुरावस्था झालेली आहे स्थानिक नेते मंडळी त्या कामाकडे त्याचे दुर्लक्ष झाले आहे. सदरील बांधकाम पाडण्यात येऊन त्याठिकाणी तात्काळ कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांच्या कुटूंबियांना राहण्यासाठी नव्याने बांधकाम तात्काळ करून द्यावे त्या जागेचे काम केल्यास त्याचा मोठा फायदा पोलीस कुटूंबियांना होईल. आज रोजी पोलीसांना डयुटीचे ठिकाणापासुन इतरत्र भाडोत्री खोली घेऊन रहावे लागत आहे.
https://www.suryamarathinews.com/crimenews-5/
बाहेरून येण्या जाण्यामुळे त्यांच्या डिवटीवर परिणाम होत आहे तरी सदरील निवेदनांची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचारी यांचा होत असलेला त्रास थांबविण्यात यावा व तात्काळ पोलीस वसाहतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे..
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश राठोड, गजानन सरकटे, गौतम नरवाडे, कुणाल माने, प्रकाश सुखधाने, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, देवानंद अवसरमोल, विजय सरकटे, नितीन गवई, सिताराम गवई, नितीन बोरकर, युनुस शहा, विजय कंकाळ, अशोक इंगळे, रवी जोरावर आदी तथागत ग्रुप संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..buldhananews