Buldhana crime update:बुलढाणा: बुलढाणा पोलीस विभाग, राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात किंबहुना राज्यात खळबळ उडविणारी घटना बुलढाणा शहरात नुकतेच घडली आहे. यामुळे बुलढाणा शहर आणि पोलीस दल अक्षरशः हादरले आहे.
चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील ( भारतीय जनता पार्टी) यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी सुमारे अर्धा तासापूर्वी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी स्थानिय जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय मधील वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.थोड्या वेळापूर्वीच बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अजय गिरी असे या पोलीस कर्मचारी आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या अंग रक्षकाचे ( बॉडी गार्ड चे) नाव आहे.
ते मागील तीन वर्षांपासून आमदार श्वेता महाले यांचे अंग रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना बुलढाणा पोलीस विभागाकडून ९ एम एम पिस्तुल ( ब्राऊनी?) देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आज बुधवारी, ३१ जुलै रोजी अजय गिरी हे कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता ताई महादेव पाटील यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने पिस्तुल देण्यात आले आहे.गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. तिथेच राहत्या शासकीय निवासस्थानी पिस्तुलनेच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली . याची माहिती मिळताच त्यांना (गिरी) यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले .
Buldhana crime update:मात्र त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी सहकाऱ्यासह भेट दिली .