जिजाऊ ज्ञान मंदिरात डॉ ए. पि. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपन्न शा.प्र. दि.15 ऑक्टोंबर(buldhana)

 

buldhana:राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथे आज भारतरत्न डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपन्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट होते.सर्वप्रथम डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ब-याच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम साहेब हे एक महान शास्त्रज्ञ तर होतेच पण एक दुरदृष्टी असलेले गैर राजकीय राष्ट्रपती होते. त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट प्राप्त केली व बॅलिस्टीक मिसाईल सारखे संरक्षणात्मक शोध आपल्या देशासाठी लावले. त्यामुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आपल्याला त्यांच्याप्रमाणेच शास्त्रज्ञ व्हायचे असेल तर प्रत्येक कृती व अभ्यास वेगळ्या पद्धतीने करायला हवा. यावेळी त्यांचे नियम, निश्चित ध्येय ठेवा, सतत नविन ज्ञानाची भुक ठेवा, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा, जिद्द व चिकाटी बाळगा यश नक्कीच मिळेल हे सांगताना, जिवनाचा खरा मार्ग ज्ञानात आहे.

buldhana:वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी दररोज दोन तास वाचन करून डॉ कलामांना आदरांजली वाहूया. यावेळी त्यांचे प्रत्यक्ष विचारही ऑडीओ क्लिप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा संदीप दादा शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment