जावेद शहा बुलडाणा
Buldhana:राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. क्रॉप सायन्स कॉलेज, पळसखेड भट मध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते. व पालक, विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी या आनंद मेळाव्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. आनंद मेळाव्यात पालकांचाही उस्फुर्त असा सहभाग होता .
पालक स्वतः विद्यार्थ्यांसोबत आनंद मेळाव्याच्या स्टॉलमध्ये सहभागी होते. या आनंद मेळाव्यात जवळपास एकुण 75 स्टॉल होते. यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांची विक्री करत जवळपास 35560 रुपयांचा व्यवसाय केला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विवीध खाद्यपदार्थाचे चविष्ट स्टॉल लावले होते. तसेच या आनंद मेळाव्यात सहभागी पालकांनी खाद्य पदार्थाचा यथेच्छ आस्वाद घेतला.
यावेळी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट म्हणाले की, आनंद मेळाव्याच्या माध्यमातून व्यावसायिक कलागुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाले पाहिजे आणि ते त्यांना भविष्यात नक्कीच कामी येतील. परिपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमातून सातत्याने मुलांना आपण प्रोत्साहन देत असतो.
Buldhana :याचाच भाग म्हणून आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांच्या मार्गदर्शन लाभले. तर शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.