त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

 

 

राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलढाणा द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर अँड ज्यु क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड मध्ये आज त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट हे होते. सर्वप्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी स.शिक्षीका प्रियंका सरकटे यांनी बहारदार गिताने सुरुवात केली. तर आराध्य लहाने, ईश्वरी बांन्डे ,प्राची सुसर ई विद्यार्थीनी आपल्या गीत तसेच भाषणातुन माता रमाई त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आला.

यावेळी शाळेचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून माता रमाई यांचे कार्य त्यांचा जीवन त्याग व त्यांनी केलेले समाजासाठीचे काम व त्याग यासह अनेक विषयावर दैनंदिन जीवनातील उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. पुस्तके वाचली पाहिजे ज्ञान वृद्धिंगत केले पाहिजे. तरच समाज सन्मान करतो. त्यागमूर्ती माता रमाईचे जीवन कार्य आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजेत, अशा महान पुरुषांचे कार्यक्रम घेण्यामागचा हाच उद्देश असतो त्यांचे जीवन कार्य आपण अंगीकारावे, हेच त्यांना अभिवादन ठरेल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष माननीय संदीप दादा शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

Leave a Comment