जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न .(buldhana)

 

पिंपळगाव सराई , बुलढाणा, महाराष्ट्र दि. ०४/०१/२०२५ शिक्षण प्रसारक मंडळ चिखली व्दारा संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई शाळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमासाठी सन २००१ पासून २००५ मध्ये १० वी मार्च ची परीक्षा दिलेले विद्यार्थी निमंत्रीत करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मोठ्या संखेने माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.

या प्रसंगी सकाळी ११:०० वाजता उद्‌घाटन समारंभ आयोजीत करण्यान आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली चे संचालक सहदेवराव सुरडकर यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य आनंदराव हिवाळे यांची उपस्थिती होती .त्यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की सोशल मिडीयाचा जपून वापर करा, केवळ ट्रोल करण्याकरीता त्याचा वापर करू नका, याशिवाय वाचन संस्कृती आपण वाढवली पाहिजे तसेच आईवडीलांची सेवा केली पाहिजे असे सांगीतले .

रा. स्व. संघाचे धाड तालूका संघचालक सुभाषजी बारसकर यांनी श्रावण बाळ व त्यांच्या आई-वडीलाचे उदाहरण देऊन आई वडीलांच्या प्रती आपला समर्पण भाव कसा असला पाहिजे ते सांगीतले .

जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार, सुमित खंडारे यांची राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली(mehkar)

याशिवाय या कार्यक्रमासाठी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती . शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक संतोषआप्पा खबुतरे , सहदेवराव सुरडकर तसेच पि. सराई गावच्या सरपंच रुपालीताई केशव तरमळे, शाळा सल्लागार समीती सदस्य मदनराव गवते, , शेषरावजी गायकवाड, साहेबराव गवते, भावसिंग सोळंके, रमेश देशमाने इत्यादी .

याच कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई यांना शिवराज्यभिषेक सोहळा दर्शन या तैलचित्राच्या दोन प्रतिमा भेट दिल्या .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मांजाटे यांनी केले, आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक भगवान आरसोडे यांनी केले.

उद्‌घाटन सत्रानंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला . भोजनानंतर दुपारी मुक्तसंवांद सत्र घेण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत प्रा. रामकृष्ण शामराव जाधव होते .

या संवाद सत्रामध्ये सन २००१ ते २००५ या कालावधीत असणाऱ्या आजी – माजी शिक्षकांची उपस्थिती होती. उपस्थितीमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य दिनकर आंभोरे, प्रकाश जावळे, राजेंद्र जाधव, विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य प्रमोद ठोंबरे या शिवाय सेवानिवृत्त शिक्षक प्रा. प्रमोद शेवाळे, विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी वामनराव आरबुने, रामदास घगे तसेच विद्यमान शिक्षक व कर्मचारी यांचा सहभाग होता .

या मुक्तसंवाद सत्रात शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांच्यात दिलखुलास संवाद झाला . माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कालावधीतील गंमतीशीर अनुभव कथन केले. या मुक्तसंवांद सत्रात सर्वांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातच माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा विकासासाठी व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक रूपाने मदत दिली. या संवाद सत्राचे सूत्रसंचालन देविदास दळवी केले.

या संपूर्ण मेळाव्याचे समन्वयक तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक गजानन पाटोळे यांनी याच कार्यक्रमात शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत माजी विद्यार्थ्यांनी करावी असे आवाहन केले.

संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आपले शालेय पूर्व जीवनाचा आनंद घेतला . अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉइंट वर जाऊन आपापल्या मित्रांसोबत सेल्फीचा आनंद घेतला .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे कौश्यल्याने आयोजन केले होते .

buldhana:या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे अध्यक्ष, सचिव सर्व संचालक मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सदस्य यांचे शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगीनी व शिक्ष‌केतर कर्मचारी बंधू भगीनी यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले .

Leave a Comment