बुलढाणा शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने बांग्लादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात भव्य निषेध मोर्चा संपन्न(buldhana)

 

अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधि

buldhana:आज दिनांक – 10 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बांग्लादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

,यामध्ये जास्तीत-जास्त हिंदूंनी सहभागी व्हावे अशी आवाहन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी केले होते.

सदर आव्हानाला प्रतिसाद देत असंख्य हिंदू बांधवांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने मोर्चासाठी आपली उपस्थिती लावली होती,

buldhana:यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्यासह असंख्य संत,महात्मा,राजकीय नेते तसेच हिंदू समाजातील जागरूक माता-भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment