इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गाव मोमिनाबाद येथे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचून विनापरवाना रेतीची चोटी वाहतूक करणारे दोन टिप्पर चार ब्रास रेतीसह पकडले वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचे कोणतेही कागदपत्र आढळून आल्याने दोन्ही टिप्पर व रेती जप्त करून वाहन चालकांना अटक करण्यात आली व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाला गुप्त व खात्रीशीर मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासणे साहेब यांच्या आदेशाने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोमीनाबाद येथे पोलीस पथकाने सापळा रचला.
यावेळीअशोक लेलँड कंपनीचे निळ्या रंगाचे टिप्पर क्रमांक MH-28-BB-1590 , व बिना नंबरचे अशोक लेलैंड कंपनीचे पिवळ्या रंगाचे टिप्पर अशी दोन वाहने येताना दिसली सदर वाहने थांबून तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये रेती आढळून आली याबाबतसचिन रघुनाथ कांडेलकर, 29, रु. दाताळा ता. मलकापूर
2) शेख अन्सार शेख शकुर वय 30 वर्षे रा. उमाळी ता. मलकापुर या दोन्ही वाहन चालकाकडे रेतीची वाहतूक करण्यासंबंधी कागदपत्र कसले बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र आढळून आले नाही.
त्यामुळे दोन्ही वाहने व रेती असा एकूण 33 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नांदुरा पोलीस स्टेशन मध्येS.P.N. सतीश काशीराम आडे, वय 39, अपॉइंटमेंट रीडर, A.P.O.A. कार्यालय खामगाव, यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ५४८/२०२३ कलम 379 I.D.V. कं ए. १५८/१७७, ३(१)/ १८१, ५/१८०, ५०/१७७ मे/से. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेहकीकत हकीकत अशा प्रकारे आहेकी, यातील नमुद घ.ता. वेळी वठिकाणी यातील नमुद आरोपी हे त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये गौणखनीज रेती अवैधरित्या चोरुन घेवुन जातांना मिळुन आले. वरुन त्यांचे कब्जातून कॉ.न. 08 प्रमाणे मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. सुनिल कडासणे साहेब, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात साहेब, खामगांव यांचे आदेशाने अपर पोलीस अधिक्षक साहेब खामगांव यांचे पथकातील सपोनि. सतिष आडे, पो.हे.कॉ. सुधाकर थोरात, निलेश चिंचोळकर, पो. कॉ. शिवशंकर वायाळ, पो. कॉ. हिरा परसुवाले यांनी केली.#buldhana #poloce