जनशक्ती शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी रंजना चव्हाण यांची निवड /buldhana 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: जनशक्ती शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या रंजना चव्हाण राठोड मॅडम यांची निवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे यांनी स्थापन केलेल्या जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्य बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात येणाऱ्या खेडोपाडी पोहचावे

या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व महिलांच्या समस्या बाबत सतत संघर्षरत राहिलेल्या महिला शेतकरी रंजना चव्हाण राठोड यांची जनशक्ती शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अतुल खूपसे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा विनिता ताई बर्फे यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लहाने यांच्या सहमतीने निवड केली आहे .

रंजना चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष या पदाची जबाबदारी मिळतात खेडोपाडी जनशक्ती शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्याचा सपाटा लावलेला दिसत आहे.

भागातील शेतकरी वर्गात विशेषता महिला शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे buldhana

Leave a Comment