Brekingnews/ शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न; एक आरोपी ओळख पटलेला, दुसरा अद्याप फरार

0
5

 

शेगाव इस्माईल शेख

शेगाव .शहरातील विद्यानगर येथील कलामाई शाळेजवळ घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी एका आरोपीची ओळख पटली असून दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. ही घटना दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 ते 3 दरम्यान घडली.

Andolannews/ अन्नत्याग आंदोलनाचा चेंडू आता जिल्हाधिकारी यांच्या दालनात ७ मे रोजी जिल्हाधिकारी सोबत शेतकरी मंडळाच्या बैठकीचे आयोजन

फिर्यादी कमलसिंग किरतसिंग परीहार (वय 32) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख अहेमद शेख समय (वय 36, रा. आरास लेआउट, बुलडाणा) व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घरासमोरील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा तसेच शेजारी राहणाऱ्या देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर फिर्यादीने शेगाव पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(A), 331(3), 62 व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Brekingnews :या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक निलेश गाडगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.पोलिसांकडून दुसऱ्या अनोळखी आरोपीचा शोध सुरूआहे.शेगावपोलिसांनीनागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here