प्रतिनिधी सचिन वाघे
Brekingnews:हिंगणघाट :- नांदगाव(बो.)येथील लक्ष्मीकांत डागा यांचे मालकीच्या भाड्याने घेतलेल्या शांती इंडस्ट्रीजच्या मालगोदामाला पहाटे ३ वाजताच्या दरम्यान गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सरकीला आग लागल्याचे निदर्शनास आले, परंतु पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण गोडाऊन आगीच्या कवेत घेतले.
आग विझविण्याकरिता हिंगणघाट पालिकेच्या तसेच स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.
Hingnghat/ दहशतवाद्याच्या पुतळयाला जाळून हिंगणघाट मनसे कडून निषेध
या गोडाऊनमध्ये शांती इंडस्ट्रीजच्या विजय अग्रवाल यांचा लाखो रुपयाच्या सरकीचा मालाचा साठा करून ठेवण्यात आला होता.
गोडाऊन वरून उच्च दाबाची वीज वाहिनी जात असल्यामुळे यातून आग लागण्याची शक्यता अग्निशमन दलाचे प्रभारी गौरव गाणार यांनी वर्तवली आहे, परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग विझविण्याचे कार्य प्रगतीपथावर असून अजूनही आग आटोक्यात आली नाही,
या करिता जिल्ह्यातील आर्वी पुलगाव डिफेन्स,सिंदि(रेल्वे), देवळी येथील अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.
आज सकाळपासूनच आग आटोक्यात आणण्याकरीता युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेग्रिगेशन पद्धतीचा अवलंब करीत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी गौरव गाणार यांनी दिली.
Brekingnews:अजूनही आग धुमसत असून आग नियंत्रणात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, यापुढे अजून ५-६ तास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणार असल्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळावर पोलीस विभाग तसेच महसूल विभागाचे अधिकारी पोचले असून तहसीलदार योगेश शिंदे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.