प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : – हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ३२२ खडसंगी ते हिंगणघाट-कानगाव झालेल्या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून त्या कामाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी केली सविस्तर चर्चा, दोषींवर कारवाई व्हावी याकरिता अतुल वांदिले यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी.
हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ३२२ खडसंगी -हिगणघाट- कानगाव महामार्गाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. ४८ किलोमीटर चा हा महामार्ग असून *२८५.९२ कोटीचा* करारनामा झाला आहे.
Ranjit Kasle/ वादग्रस्त PSI रणजीत कासलेला बडतर्फी; बीड पोलीसांच्या ताब्यात
खडसंगी -हिगणघाट- कानगाव असा डांबर व सिमेंट कॉन्क्रीट चा रोड निर्माण करण्याचे काम मागील चार वर्षापासून थंड पद्धतीने सुरु आहे. या निर्माण कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून करोडो रुपयाचा भष्ट्राचार केला जात आहे.
विविध खेड्यापासून तर हिंगणघाट शहरापर्यंत या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असताना देखील गुणवत्ता तपासणीसाठी रस्त्यावर एकही अधिकारी आजपर्यंत आलेला नाही. पीडब्ल्यूडी विभागाचे या संपूर्ण प्रकरणाकडे मागील चार वर्षापासून दुर्लक्ष आहे.या हायब्रिड हंम्प महामार्गाचे काम पगारिया कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले.
या कंपनीला रस्त्याच्या कामाचा अनुभव नसताना देखील कोणत्या आधारावर या कामाचा निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत ? चार वर्षा पूर्वी या महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र चार वर्षापासून या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे सुरु असून महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. रस्त्याच्या बाजूला मुरूम न टाकता माती टाकण्यात आली आहे. तसेच महामार्गाच्या बाजूला नाली आडवी -तिडवी घेण्यात आली आहे.
Brekingnews:या महामार्गाचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असल्यामुळे आठ महिन्यामध्ये सदर रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यांना पॅचेस लावण्याचे काम करावे लागत आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला असून या झालेला कामाची चौकशी करण्यात यावी तसेच येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.