भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)

 

खामगाव ( इस्माईल शेख ): ग्रामस्थांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात जलजीवन योजना राबवित आहे. मात्र संबंधित ठेकेदार भ्रष्ट यंत्रणेमुळे सरकारच्या उद्देशाला छेद देत आहे.

मागीलवर्षी संग्रामपूर तालुक्यातील चिंचारी येथील पाण्याची टाकी कोसळल्यानंतर प्रकरण निस्तारण्याचे प्रकार सुरू झाले होते. परंतु याबाबत बिंग फुटल्याने कंत्राटदाराने पुन्हा पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचा करारनामा जि.प. पाणी पुरवठा विभागाला करून दिला होता. याचे काय झाले याची माहिती मिळाली नाही.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

पण खामगाव तालुक्यातही असाच प्रकार घडल्याने भ्रष्ट यंत्रणेमुळे जलजीवन योजनेचा ब‌ट्ट्याबोळ होत असून ही योजनाली

ग्रामस्थांच्या मुळावर उठत असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात वृत्त असे की,

जलजीवन मिशन योजने अंतर्गत खामगाव तालुक्यातील अंत्रज या गावामध्ये पाण्याचे

टाकीचे बांधकाम सुरू असताना १५ फेब्रुवारी रोजी बांधकाम कोसळले. निकृष्ट दर्जाचे साहित्या वापरल्यानेच हा प्रकार झाला असावा. या घटनेने जिवितहानी झाली नसली तरी एकदोघांना दुखापत झाल्याचे समजते. या अगोदर सुद्धा २० – २० फ टाचे बांधकाम केल्यानंतर पिंजरा पाडण्यात आला होता.

या योजनेसाठी शासनाने ५ कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या निधीचाही गैरवापर चालू आह. एका पावसाच्या पाण्याने पाईपलाईन उघडी पडली आहे. यापूर्वी यामध्ये एक बैलजोडी अडकून मृत्यूमुखी पडली असल्याचे सांगण्या येत आहे.

brekingnews:याबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Comment