लोणारमधून विकल्या जात होती कामवासना वाढवणारी औषधी; बिनधास्त विकायचा गर्भपाताची औषधे ; अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत २५ लाखांचा माल जप्त…(brekingnews)

 

अनेक वर्षा पासुन विकण्याचा अंदाज

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:राज्यातील शासकीय रुग्णालयाना झालेल्या औषध पुरवठा वरून खळबळ उडाली असतानाच बुलढाणा जिल्ह्यात अवैध औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य आणि अन्न औषध विभाग सतर्क झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे गाव जगप्रसिध्द लोणार या खाऱ्या पाण्याच्या सरोवर मुळे प्रसिद्ध आहे.मात्र याच जगप्रसिद्ध सरोवर नगरीत अवैध औषधाचा मोठा साठा आढळून आला आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

या कारवाई बाबत काटेकोर गुप्तता बाळगण्यात आली. त्यामुळे कारवाईचा विस्तृत तपशील कळू शकला नाही.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार सुमारे पंचवीस लाख रुपयांचा हा औषधी साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य साशनाच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभागाचे वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा आणि वाशीम जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे त्यांनी वाशीम जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक एम.व्ही. गोतमारे यांच्या समवेत लोणार येथील चंदन मेडीकोजचे मागे रुम क्रमांक १, बस स्थानक जवळ, लोणार येथे छापा घालून चौकशी केली.

यावेळी करण्यात आलेल्या तपासणी व कारवाईत सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आले. मेडिकल वर उपस्थित व्यक्ती सुशिल पुनमचंद दरोगा यांच्या कडून नमूना सोळा व पंचनामा अंतर्गत एकूण चोवीस लाख तेहतीस हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठयातून औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधी (Vigrox-100) आढळून आला. या उत्तेजक औषधींचा साठा नमूना 15 प्रतिबंधीत करण्यात आला आहे.

brekingnews:झोपेच्या गोळया, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व ॲलोपॅथीक औषधे त्यांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत, तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे अशा प्रकारचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येनार आहे. जिल्हयातील सर्व मेडीकलधारकांना सहायक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांनी हा इशारा दिला आहे.

Leave a Comment