प्रतिनिधी सचिन वाघे
brekingnews:हिंगणघाट दि.१९ डिसेंबर:- बुरकोनी येथील एका अविवाहित युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी मौजा लाडकी शिवारातील रेल्वे गेट क्र.१९ जवळ घडली.
विशाल रमेश चाफले(२६) अशी या युवकाची ओळख असून हिंगणघाट पोलिसांत मृतकावर घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा मनस्ताप झाल्याने निराशेपोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याचे कुटुंबियांनी केला आहे.
काल पोलिस पंचनाम्यानंतर विशाल याचा मृतदेह शव विच्छेदनाकरीता स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आणला.
आज गुरुवारी शव विच्छेदन झाल्यानंतर मृतकाचे कुटुंबियांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी करीत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
हिंगणघाट बहुजन समाज पार्टी कडुन निवेदनातून केली मागणी(Hingnghat)
काल पासूनच मृतकाचे कुटुंबियांसह बुरकोनी येथील नागरिकांनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात ठाण मांडले असून दोन इसमांसह एका महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दि.१३ रोजी पोलिसांनी विशाल रमेश चाफले याचेवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यात वर्धा येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मृतकास ताब्यात घेतले होते. गावातील जुन्या वैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप मृतकाचे कुटुंबीयांनी केला आहे.
मृतकाने आत्महत्या केली त्यापूर्वी त्याला हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात चौकशी करिता बोलविण्यात आले होते. अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे,यानंतर त्याने घरी जाऊन शेतावर जातो असे घरच्यांना सांगितले, परंतु शेतात न जाता त्याने निराशेपोटी लाडकी शिवारातील रेल्वेलाईन वरती येणाऱ्या ट्रेनपुढे उडी घेऊन आत्महत्या केली.मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार.
सरकारी दवाखाना येथे
brekingnews:शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल वांदिले यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले, संबंधीत प्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करावी अशी मागणी केली.